सावंतवाडी
इंग्लंड येथील ‘ युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स ‘ च्या अंतर्गत कार्य करणाऱ्या ‘ सोसिओ लिटररी माईंड ‘ इंस्टीट्यूट च्या वतीने दर दोन वर्षांने देण्यात येणाऱ्या ‘ सोसिओ लिटररी माईंड ‘ या आतरराष्ट्रीय किताबासाठी भारतातुन कवी, लेखक, नाटककार, दिग्दर्शक सामाजिक कार्यकर्ते, वक्ते डॉ. अनिल सरमळकर यांचे नामांकन झाले असुन अंतिम पुरस्कार विजेता निवड एप्रिल २०२३ मधे जाहीर करण्यात येणार आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ लीड ‘ इंग्लंडमधील आतरराष्ट्रीय ख्यातीचे ‘ मानव्य विद्या आणि सामाजिक कार्याचे शिक्षण देणारे विद्यापीठ आहे. तथापि या इंस्टिट्यूटने सदर प्राईझसाठी डॉ. अनिल सरमळकर यांच्या सामाजिक व साहित्य व सांस्कृतिक योगदानाची दखल घेतली असुन जगभरातील प्रतिकूल काळ व परिस्थितीत सामाजिक क्षेत्र व लेखन क्षेत्रात योगदान देणाऱ्या तरुण तरुणींना हा किताब दिला जातो.
इंग्लंड येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स येथील ज्येष्ठ कल्चरल थियरीस्ट, समीक्षक विचारवंत जॉन ब्रेट यांनी अनिल सरमळकर यांचे महत्वाचे इंग्रजी लेखन गेली तीन चार वर्षे वाचले आहे आणि ते अनिल यांच्या लेखनाचा वैश्विक दर्जा आणि व्यापकता पाहुन प्रभावित झाले आहेत. आणि अनिल यांचा गौरव त्यांनी ‘ आंबेडकर इन आर्टस ‘ अशा शब्दात केला आहे. त्यामुळेच इंग्लंड व अमेरिकन विद्यापीठांत सरमळकर यांच्या इंग्रजी नाटक कविता व वैचारीक लेखनाची सध्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ लीड अंतर्गत येणाऱ्या ‘ सोसिओ लिटररी माईंड इंस्टिट्यूट ‘ मध्ये मानव्यविद्या आणि सामाजिक कार्य याचे अध्यापन केले जाते. तसेच साहित्य व सामाजिक क्षेत्रात कठीण काळात व परिस्थितीत रचनात्मक आणि दर्जेदार कार्य
करणाऱ्या जगभरातील तरुन तरुणींना प्रोत्साहन आणि बळ देण्यासाठी सदर किताब दर दोन वर्षाआड दिला जातो. ज्येष्ठ विचारवंत जॉन ब्रेट यांनी अनिल सरमळकर यांच्या लेखन व सामाजिक कार्याची शिफारस या इंस्टीट्यूटकडे केली असुन २०२३ च्या ‘ सोसिओ लिटररी माईंड ‘ प्राईजसाठी भारतातून अनिल सरमळकर यांना नामांकन मिळाले आहे.
गेली अनेक वर्षे अनिल सरमळकर सामाजिक, रंगभूमी, साहित्य क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीतीशी झुंजत कार्य करत असुन सामाजिक परिवर्तन चळवळीत ते कार्य करित असताना त्यांनी कविता, नाटक, दिर्घ कविता, समीक्षा, कादंबरी, वैचारीक लेखन मराठी व इंग्रजी भाषेतुन ते सातत्याने करीत आहेत.
सदर पुरस्कार विजेत्याची घोषणा एप्रिल २०२३ मधे होणार आहे.