You are currently viewing मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत आरोग्य शिबीर…

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत आरोग्य शिबीर…

दीपक केसरकर मित्रमंडळाचा पुढाकार; अनेकांनी घेतला लाभ…

सावंतवाडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी, कॅन्सर निदान शिबीर व महा रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी अनेकांनी या शिबिराला उपस्थिती दर्शविली. शिबिराचे उद्घाटन शिंदे गटाचे तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष अनारोजीन लोबो माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी नगरसेविका दिपाली सावंत, भारती मोरे, प्रसन्ना उर्फ नंदू शिरोडकर, आबा केसरकर, गजानन नाटेकर, नंदू गावडे, सुजित कोरगावकर, परशुराम चलवाडी, शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, विनायक सावंत, अभिजीत मेस्त्री तसेच शैलेजा पारकर, प्रतिमा सिंग, अरुणा बांदेकर, स्वप्ना नाटेकर, पूजा नाईक, नीलिमा चलवाडी, सुवर्श्री गाड आदी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांनी शिबिराचे उद्देश आणि होणाऱ्या उपचारांबाबत माहिती दिली. यावेळी तज्ञ डॉ. संदीप सावंत, गिरीश कुमार चौगुले, डॉ. आकाश एडकर तसेच डॉ. वैशाली शिरोडकर यांनी कर्करोगाबाबत विशेषतः स्त्रिया आणि पुरुषांना मार्गदर्शन केले आणि तपासणी केली. याप्रसंगी वैद्यकीय कर्मचारी सिस्टर विजया उबाळे, बागेवाडीकर, रेडकर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य विभागाच्या आरोग्य मित्र शोभावती कोरगावकर, शालिनी विरोडकर, प्रगती कदम, प्राची राणे, अमृता मुंगी, विद्या हेळेकर, सुप्रिया नाईक, जानवी कुसे यांची उपस्थिती होते.
या शिबिरामध्ये सर्व आवश्यक चाचण्या व उपचार मोफत करण्यात आले. शिबिराचा सामान्य जनतेला लाभ देण्यात आला. तसेच रक्तदान शिबिरामध्ये सिंधू रक्त मित्राच्या रक्तदात्यांकडून मोठ्या संख्येने रक्तदान करण्यात आले. यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा