You are currently viewing कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून महिलांना खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण…

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून महिलांना खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण…

बांदा

कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत भडगाव बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव ग्रामपंचायत येथे १५ वा वित्त आयोगाअंतर्गत बचत गटातील महिलांना मोफत खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

महिला, शेतकरीवर्ग व युवकांना स्वयंरोजगारामिभूख प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने कोकण कला व शिक्षण विकास संस्था सर्वतोपरी सहकार्य करत असते. या प्रशिक्षणात बचत गटातील ३२ महिलांनी सहभाग घेतला होता. फेनोरी, खाजा, चकली, शेव, शंकरपाळी, बालुशाही आदी खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. या शिबिरासाठी प्रियांका शेट्ये प्रशिक्षक म्हणुन लाभल्या होत्या. यावेळी संस्थेचे समन्वयक समीर शिर्के यांनी महिलांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले. ग्रामसेवक सौ. अनिला घुगरे यांनी ग्रामपंचायत च्या माध्यमातून महिलांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. भडगाव गावच्या सरपंच सौ. प्रणिता गुरव यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या व कोकण संस्थेचे आभार मानले. या प्रशिक्षणाला उपस्थित सर्व महिलांना संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण कला व शिक्षण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत, प्रदीप पवार, सौ. भावना साटम तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा