You are currently viewing ट्विटरचे सर्व्हर डाऊन, फेसबुक-इन्स्टावरही हजारो वापरकर्त्यांना येतेय अडचण

ट्विटरचे सर्व्हर डाऊन, फेसबुक-इन्स्टावरही हजारो वापरकर्त्यांना येतेय अडचण

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम जगभरातील हजारो वापरकर्त्यांसाठी डाउन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यूएस मधील वापरकर्त्यांकडून याबाबत सर्वाधिक प्रमाणात तक्रारी नोंदवल्या आहेत.

ट्विटर सर्व्हर डाउन झाल्याने अनेक वापरकर्त्यांना त्यांचे खात्यावर लॉग इन करताना अडचणींचा सामना करवा लागत आहे. Tweetdeck देखील काम करत नसल्याने वापरकर्त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. याशिवाय अनेक यूजर्सनी फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या सर्व्हरबाबतही तक्रारी केल्या आहेत.

काही वापरकर्ते ज्यांनी नवीन ट्विट पोस्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांना एक पॉप-अप प्राप्त झाला ज्यामध्ये “तुम्ही ट्विट्स पाठवण्याची दैनिक मर्यादा ओलांडली आहे” असा एरर आल्याचे समोर आले आहे. दरम्यान ट्विटरच्या सपोर्ट टीमने सांगितले की त्यांना या तांत्रिक अडचण समजली आहे आणि तिचे निराकरण करण्यासाठी ते काम करत आहेत.

तुमच्यापैकी काहींच्या अपेक्षेप्रमाणे ट्विटर कदाचित काम करत नसेल. त्रासाबद्दल क्षमस्व. आम्ही जागरूक आहोत आणि ही अडचण दूर करण्यासाठी काम करत आहोत, असे ट्विटर सपोर्ट कडून सांगण्यात आले आहे.

इलॉन मस्क यांनी प्लॅटफॉर्मचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारल्यापासून ट्विटरला अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आहे आणि 2022 मध्ये निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आहे.

आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरने देखील ट्विटर आणि फेसबुक, इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मसाठी वापरकर्त्यांच्या ग्लिच रिपोर्टमध्ये वाढ नोंदवली आहे

12,000 हून अधिक फेसबुक वापरकर्त्यांनी आणि Instagram साठी सुमारे 7,000 वापरकर्त्यांनी तांत्रिक अडचणी नोंदवल्या .

प्रतिक्रिया व्यक्त करा