*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास पवार (अण्णा) लिखित अप्रतिम अभंग रचना*
*सद्गुरु अभंग (राम वाणी)*
सद्गुरु माझा। दयेचा सागर।
ज्ञानाची घागर। ओसंडतो।।१।।
अनंत महिमा। संसारी विरक्त।
कृपाळु अव्यक्त। माझ्यासाठी।।२।।
पामरास केली। मोकळी तिजोरी।
ठेऊन शेजारी। शिकविले।।३।।
नाही पुण्य संच। नाही तसा पात्र।
अज्ञानाचे छत्र। दुर केले।।४।।
सांगितले मज। आहे धुर्त माया।
झिजवावी काया। मोक्षासाठी।।५।।
स्वार्थाचा मनात। नसावा विचार।
ज्ञानाचा प्रचार। व्हावा जगी।।६।।
सद्गुरु कृपा। देत आहे बळ।
म्हणुन सकळ। जन्म सुख।।७।।
म्हणे रामदास। पायी ठाव द्यावा।
पामरास व्हावा। साक्षात्कार।।८।।
रामदास आण्णा
गाव तीर्थक्षेत्र श्री चक्रधर स्वामी मंदिर मासरुळ जिल्हा बुलडाणा
©® चे अधिकार आरक्षित
7350735973/7987786373
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*