मालवण
चिंदर भगवंतगड येथे पात्रात मुळे काढण्यासाठी उतरलेले त्रिंबक पलीकडची वाडी येथील चंदन भिवा घडीगावंकर वय 55 यांचा मृत्यू झाला आहे सदर घटना ही रविवारी दुपारी तीन ते सायंकाळी 6च्या सुमारास घडली आहे. या प्रौढाचा मृतदेह खाडीपात्रात दिसून आला होता. या घटनेची आचरा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदन भिवा घडीगावंकर हे नदीपात्रात मुळे काढण्यासाठी 3 वाजण्याच्या उतरले होते त्यानंतर ते दिसून आले नव्हते सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास चिंदर भगवंतगडतरी येथे स्थानिकांना पाण्यात एक मृतदेह तरंगता दिसून आला होता यांची खबर त्यांनी चिंदर पोलीस पाटील दिनेश पाताडे यांच्याकरवी आचरा पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर कोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई, हवालदार बबन पडवळ, मनोज पुजारे दाखल झाले होते. मृतदेह बाहेर काढून पाहणी केली असता तो चंदन भिवा घडीगावंकर यांचा असल्याचे निष्पन्न झाले. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई, संदीप कांबळे करत आहेत. मयत चंदन घडीगावंकर यांच्या पश्चात आई, विवाहित बहीण असा परिवार आहे.