You are currently viewing …..व्यक्ती विशेष…!

…..व्यक्ती विशेष…!

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्यिकाला व्यक्तित्व विकास मंच चे कार्यकारिणी सदस्य लेखक कवी डॉ. चिदानंद फाळके तथा डॉ. चंद्रकांत आप्पासाहेब फाळके…..*

*…….व्यक्ती विशेष…!!*

“चला दोस्त हो स्ट्रेस वर बोलू काही…” असे म्हणत स्ट्रेस मॅनेजमेंट याविषयावर अनेक व्याख्याने घेणारे खासम खास व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.चिदानंद फाळके …साकव्य समूहाचे हरहुन्नरी, चतुरस्त्र, पदाधिकारी अन् डॉकटर म्हणून त्यांची आपल्याला ओळख आहेच… परंतु जेव्हा आपण डॉ.चिदानंद फाळके यांना जवळून अनुभवतो तेव्हाच आपल्याला त्यांचं सामाजिक स्तरावर सुरू असलेलं निस्वार्थी बहुमोल असं कार्य समजून येईल.
चला आपण त्यांच्या बहुमोल अशा कार्यावर प्रकाशझोत टाकूया….👇
*बहुमोल कार्य* :-
— “स्ट्रेस मॅनेजमेंट” ह्या विषयावर आजपर्यंत अनेक व्याख्याने दिलीत आणि कार्यशाळा घेतल्या.
— आजवर महाराष्ट्र भरातून आलेल्या “हजारोंच्यावर” कर्मचारी, विद्यार्थी यांना “ताण तणाव व्यवस्थापना” द्वारे फायदा झाला. प्राप्त अभिप्रायांवरून अनेक कर्मचाऱ्यांच्या सेवेतील कामगिरी सुधारली, आरोग्य सुधारले आणि त्यांच्याहातून होणारे अपघात टळले गेल्याने प्राण वाचले, जीवितहानी टाळली गेली. सदर कार्याचा गौरव म्हणून *”भारत भूषण”* या भारत सरकारच्या नीती आयोगाने प्रमाणित पुरस्काराने सन्मानित.
—- कोरोनाच्या मागील एक वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक कोरोना पॉझिटिव्ह लोकांशी फोनवर बोलून त्यांना मोटीव्हेट केले, त्यांच्या मनातील भीती घालविल्याने ते सर्व भयमुक्त होऊन आजारातून लवकर बरे झालेत.
—- समाजव्रत समजून “स्ट्रेस मॅनेजमेंट” ची सर्व व्याख्याने आणि *”चला दोस्तहो ‘स्ट्रेस’ वर बोलू काही”* हा कार्यक्रम *मोफत* निरंतर देत आहे.
—- सदर कार्याची दखल घेत *अमेरिका* स्थित *भारत एफ एम* या रेडिओ स्टेशनने त्यांच्या “रुबरु” ह्या कार्यक्रमात एक तासाची मुलाखत घेतली.
—- सदर कार्याची नोंद जागतिक स्तरावरील हायरेंज *”बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड”* मघ्ये करण्यात आली.
डॉ.चिदानंद फाळके हे डिग्री घेण्यासाठी बनले नाहीत तर डिग्री त्यांच्यासाठी बनल्या आहेत असेच त्याचं शिक्षण आहे. सर्वप्रकारच्या डिग्री घेऊनही…अनेक पुरस्कार प्राप्त करूनही हसतमुख चेहऱ्याने सर्वांना आनंद देणारे डॉ. चिदानंद फाळके म्हणजे चिरतरुण व्यक्तिमत्त्व…!
पाहूया एक झलक त्यांच्या शैक्षणिक वाटचालीची….आणि शिक्षण क्षेत्रातील सेवेची…👇
*शिक्षण* :
*एम.डी.* (प्राकृतिक चिकित्सा),
*एम.टेक* (आई.टी.),
*एम.ई.-१* (ई.टेली- रडार इंजि.),
*एम.बी.ए.*(प्रोजेक्ट मॅनेजमेंट),
*बी.ई.* (ई. टेली.)
(विद्यापीठात सर्वप्रथम),
डी.आय.ई. ई..

*शिक्षण क्षेत्र सेवा* :
१. आई.एस.टी. ई. (आजीवन सदस्य)
(इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन)
२. सुरवातीला इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये टीचर होतो आता सध्या महाराष्ट्रातील सर्व अभियंते आणि तंत्रज्ञ यांना शिकविण्याचे कार्य MSEDCL चे एकलहरे येथील प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेत सुरु आहे. एकूण संपूर्ण सेवा २९ वर्षाची झाली आहे.
डॉ.चिदानंद फाळके यांना अनेक नामांकित पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात राष्ट्रीय स्तरापासून सामाजिक स्तरावरील कित्येक पुरस्कारांचा समावेश आहे. नीती आयोगाचा भारत भूषण पुरस्कार ते शिक्षण क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, पत्रकारिता, इंजिनियरिंग क्षेत्र…साहित्यिक…परीक्षण…अशा सर्वच क्षेत्रांच्या पुरस्कारांची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे आणि जबाबदारी देखील वाढली आहे… एक नजर टाकुया डॉ.फाळके यांच्या पुरस्कारांवर….👇
*पुरस्कार* :
१. *”भारत भूषण २०२१”* NAHF आणि भारत सरकारच्या नीती आयोगाने प्रमाणित पुरस्कार स्ट्रेसमुक्तीच्या कार्यासाठी. स्ट्रेसफ्री कर्मचाऱ्यांचे अपघात होत नाहीत.
२. *”डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रउभारणी प्रेरणा”* पुरस्कार स्ट्रेसमुक्तीच्या कार्यासाठी.
३. *”नाशिक भूषण”* हा प्रतिष्ठेचा नाशकातील सर्वोच्च नागरी सन्मान, शासकीय सेवा, शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल प्राप्त.


४. *”राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार”* हा मानाचा पुरस्कार भारतीय पत्रकार संघातर्फे प्राप्त.
५. *”उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार”* (विद्यार्थी संघामार्फत)
६. *”उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार”* राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेतील अभिनयासाठी.
७. *”समाज भूषण”* हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक आणि संस्कृतीक कार्याबद्दल प्राप्त.
८. *”मिस्टर इंजिनीअर अवॉर्ड”* (सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल)
९. *”साहित्य संमेलन काव्य पुरस्कार”*, दुसऱ्या राज्यस्तरीय जीवन गौरव साहित्य संमेलनात प्राप्त.
१०. *”काव्यरत्न”* हा मनाचा पुरस्कार नागपूर येथील मराठीचे शिलेदार संस्थेकडून प्राप्त.
११. *”विनोबा भावे सम्मान”* – सोसायटी फॉर युथ डेव्हलपमेंट, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सन्मान सामाजिक कार्यासाठी प्राप्त.
१२. *”परीक्षक सन्मान”*, जिल्हास्तरीय “बालकाव्य” स्पर्धेचे परीक्षक पद भूषविल्याबद्दल सन्मानित.
१३. *”परीक्षक सन्मान”*, राज्यस्तरीय “बालकाव्य” स्पर्धेचे परीक्षक पद भूषविल्याबद्दल सन्मानित.
१४. *”काव्य सन्मान”*, नक्षत्रांचे देणे काव्यमंचातर्फे काव्य सादरीकरणासाठी.
१५. *”नॅशनल एज्युकेशनल लिडरशीप अवॉर्ड”* साठी नामांकनओ प्राप्त.
१६. *”ज्योतिबा फुले सम्मान-२०१९”*- सोसायटी फॉर युथI डेव्हलपमेंट, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सन्मान शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी.
१७. *”परीक्षक सन्मान”*, जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेचे परीक्षक पद भूषविल्याबद्दल सन्मानित, “साहित्यकणा फाऊंडेशन”, नाशिक.
१८.  *”जीवन गौरव”* पुरस्कार : संत गाडगे महाराज जीवन गौरव हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी प्राप्त.
१९. *”बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड”* नुकताच सामाजिक, शैक्षणिक व विविध कार्याचा गौरव हायरेंज “बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मघ्ये करण्यात आला.
२०. *”साहित्य संमेलन सन्मान”* ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील काव्यकट्ट्यात कविता सादरीकरण सन्मानचिन्ह.
२१.  इतर पारितोषिके विविध चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, कॅरम स्पर्धा, मूर्तिकला, कविता, लेख, अभिनय यासाठी मिळालेले आहेत.
असे सर्वच क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्त्व अनेक प्रकारचे छंद देखील आपल्या अंगी बाणवून आहे…. पाहूया त्यांचे छंद….👇
*छंद* :-
— वाचन, गद्यलिखाण, काव्य लिखाण, सूत्रसंचालन, चित्रकला, पोर्ट्रेट पेन्सिल स्केच, मूर्तिकला, गायन, अभिनय, वक्तृत्व, कॅरम खेळणे, मॉडेल तयार करणे.
— आताच “रेडिओ जॉकी” चे प्रशिक्षण पूर्ण केल्याने RJ हा नवीन छंद जडला.
रेडिओ जॉकी…छंद जडला त्यामुळे त्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेले आनंदी व्यक्तिमत्त्व डॉ.चिदानंद फाळके यांचे वाचन आणि लेखन देखील दांडगे आहे…
कविता, लेख, साहित्य अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतंच असते. जाणून घेऊया त्यांच्या साहित्यिक वाटचाली बाबत….👇
*लेखन साहित्य प्रसिद्धी*
— कविता, लेख आणि चारोळी वृत्तपत्रातून व मासिकांतून प्रसिद्ध.
— व्यंगचित्र वृत्तपत्रातून प्रसिद्ध.
— “शिक्षकांच्या कविता” हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित.
— “आम्ही काव्यरत्न” हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित.
— “काव्यतरंग” सामूहिक काव्यसंग्रह (ईबुक) प्रकाशित- शॉपिझेनद्वारे.
— “इफेक्टिव्ह प्रोजेक्ट मॅनेजमेंट”, ह्या विषयावरील पुस्तक प्रकाशित (अंतर्गत वितरणासाठी).
— “कोजागरी” काव्य संग्रह प्रसिद्धीच्या मार्गावर.
— “रेडिओ विश्वास” ह्या रेडिओ स्टेशनवर “कविता वाचन” कार्यक्रमात मुलाखत आणि कविता वाचन.
— “रेडिओ विश्वास” ह्या रेडिओ स्टेशनवर “व्हॅलेंटाईन डे स्पेशल” कार्यक्रमात चर्चा व कविता वाचन.
— अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच झालेल्या बालसाहित्य मंचावरील परिसंवादाचे ‘सूत्रसंचालन’.
— “रेडिओ विश्वास” ह्या रेडिओ स्टेशनवर “भारतभूषण” सन्मानानिमित्त मुलाखत आणि कविता वाचन.
आपले छंद, आवड आणि व्यवसाय जोपासतानाच समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी आणि कर्तव्य या भावनेतून डॉ.चिदानंद फाळके विविध ठिकाणी, विविध माध्यमातून समाजकार्याची कामे देखील करत असतात. त्यांच्या समाजकार्याची देखील अनेक संस्था आणि सरकारी माध्यमांनी दखल घेतली आहे. समाजासाठी झटणाऱ्या या महान समाजसेवकांच्या कार्यावर एक नजर फिरवूया….👇
*सामाजीक कार्ये व इतर कार्य* :-


,,,,,,  पूरग्रस्तांना घरोघर जाऊन मदत, मित्र आणि समाज बांधवांना एकत्र आणून जवळपास शंभर पूरग्रस्त लाभ घेऊ शकतील इतका तांदूळ, डाळ, मसाला आणि सर्व प्रकारचे कपडे आणि साड्या या सामग्रीचे वाटप.
,,,,,  संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त रात्री उघड्यावर झोपणाऱ्या गरिबांसाठी “ब्लॅंकेट वाटप” गाडगे महाराज पतसंस्था नाशिक यांच्या बरोबर.
,,,,,  संत गाडगे महाराज जयंती निमित्त त्रंबकेश्वर येथील अनाथ मुलींच्या “बालसदन” आश्रमातील मुलींना ड्राईंग वह्या व कलर पेंटींचे वाटप.
,,,,,,  कोव्हिड-१९ च्या भयावह परिस्थितीत, लॉकडाऊन एक, दोन, तीन मध्ये समाजातील खरोखर गरजू कुटुंबांना तांदूळ, गहू प्रत्येकी ५ किलो, चना डाळ १ किलो, गोडेतेल २ लिटर पॅक आणि मसाला पॅकेट घरोघरी जाऊन वाटप केले.
,,,,,  कोरोनाशी लढण्यासाठी मास्क अतिमहत्वाचे असल्याने, अखंड वीज पुरवठा सुरळीत ठेवणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यांना कापडी मास्क धुऊन पुन्हा वापरता येणारे असे एकूण १५०० मास्क मित्रांच्या सहाय्याने वितरित केले. काही कापडी मास्क स्वतः घरी शिलाई मशीनवर शिवून तयार केलेत.
,,,,,   एका गरीब घरातील जीला वडील नाही, आई झाडू मारण्याचे काम करते ती जिल्हास्तरीय महिला कुस्ती स्पर्धेत विजयी झाल्या निमित्त मित्र सहकार्यांना च्या मदतीने तिचा सत्कार व रोख रक्कम जमा करून थोडासा आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न केला.
,,,,,,,  वाढदिवस केक न कापता साजरा करून, त्याऐवजी “गुळाची भेली” कट करून वाटप आणि आलेल्या प्रत्येकाला “सीड बॉल” वाटले. काळ्या मातीचे गोळे करून आतमध्ये कृष्णतुळस व फळ फुल झाडांच्या बिया टाकून तयार गोळ्यांना आकर्षक कागदाचे वेष्टन लावून भेट म्हणून वाटत असतो.
,,,,,,,  परिवारातील आणि मित्रमंडळीतील सदस्यांच्या वाढदिवशी ज्याचा वाढदिवस आहे त्यांच्या हातून “वृक्षारोपण” करून झाडी लावण्याचा निरंतर कार्यक्रम.
,,,,,,,,  “वनबंधु” ह्या राष्ट्रीय पातळीवरील समाजसेवी संस्थेचे आजीवन सदस्यत्व, नाशिकच्या जवळील आदिवासी भागातील गरीब व वंचित आदिवासींसाठी मदतकार्य.
,,,,,,,,,, सुटीच्या दिवशी स्वतः आदिवासी वाडी पाड्यावर जाऊन लहान मुलांना शालेय वस्तू, वह्या, पेन, पेन्सिल, चप्पल, बूट, कपडे आणि खाऊच्या स्वरूपात नियमित मदत.
,,,,, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना चालना देण्यासाठी सांस्कृतिक समितीद्वारे विशेष योगदान.
,,,,,  विविध सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन.
,,,,,  शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना विविध प्रबोधनपर शैक्षणिक व्याख्याने.
,,,,, विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रम कमिटीचे सदस्यत्व, अभ्यासक्रम पुनर्रचना करण्यात योगदान.
डॉकटर म्हणून स्वतःचे कर्तव्य, जबाबदारी आणि सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ.चिदानंद फाळके अनेक पदांवर कार्यरत असून कितीतरी संस्था, समूहाच्या पदभार ते सांभाळत आहेत….
एक दृष्टीक्षेप टाकू त्यांच्या पदांवर…👇
*पदे व पदभार* :-
,,,,,,, सध्या “प्रोफेशनल ट्रेनर” म्हणून प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र, मराविविकं मर्या., एकलहरे, नाशिक येथे पदभार.
,,,,,,  उत्सव व समारंभ कमिटीचे “अध्यक्ष” पद.
,,,,,,  अखिल भारतीय पत्रकार संघाचा “मानद सदस्य”.
,,,,,,  श्री जिव्हेश्वर सेवा मंडळ, नवीन नाशिक  च्या जयंती उत्सव समारंभाचा “कार्याध्यक्ष” म्हणून पदभार.
,,,,,,, बालकवी स्पर्धा नाशिक साठी “परीक्षक” म्हणून पदभार.
,,,,,,, निसर्ग आणि आरोग्य संदेश देणाऱ्या “निसर्ग विज्ञान ज्ञानपीठ” ह्या संस्थेची स्थापना व अध्यक्ष.
,,,,,,, निसर्ग जपण्यासाठी कार्यरत असलेल्या “हिरवाई” संस्थेचे सदस्य.
,,,,,,, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी एन. एस. एस. चा
“समन्वयक”.
,,,,,,, आय एस टी ई  ह्या संस्थेचे “आजीवन सदस्य”.
,,,,,,,  “वनबंधू” ह्या आदिवासी लोकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे “आजीवन सदस्य”.
,,,,,,, “राज्यस्तरीय काव्यस्पर्धा”, साहित्यकणा फाउंडेशन साठी “परीक्षक” म्हणून पदभार.
,,,,,, अभियांत्रिकीच्या पुणे विद्यापीठा अंतर्गत परीक्षेसाठी “बाह्य परीक्षक”.
,,,,,,, म रा वि वि कं मर्या अंतर्गत मुख्य कार्यालयामार्फत “कॉस्ट डेटा” समिती सदस्य.
,,,,,  म रा वि वि कं मर्या अंतर्गत घेण्यात आलेल्या “उत्कृष्ट उपकेंद्र स्पर्धे” साठी तज्ञ परीक्षक.
,,,,,,, साहित्य मांदियाळी, साहित्य कला व्यक्तिविकास,  गुरुमाऊली चारोळी कट्टा, नक्षत्रांचं देणं, मराठीचे शिलेदार, समस्त साळी साहित्य संघ इत्यादी संस्थांचा “उपक्रमशील सदस्य”.
,,,,,,, जिव्हेश्वर सेवा मंडळ ह्या सेवाभावी कार्य करणाऱ्या संस्थेचा “कार्यकारी सदस्य”.
,,,,,,,, उपाध्यक्ष, जागतिक साहित्य कला आणि व्यक्तिमत्व विकास संस्था.
,,,,,,,, ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, स्वागत समिती सदस्य.
,,,,,,,,, सूत्रसंचालक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील बालसाहित्य मंचावरील परिसंवादाचे सूत्रसंचालन.

अश चतुरस्त्र हरहुन्नरी समाजसेवी डॉ.चिदानंद फाळके यांना मानाचा मुजरा….🙏🙏

*डॉ. फाळके सी. ए.*
*कर्णसखा/व्हॉट्सॲप* : 9923376755
*पत्ता* :- नाशिक -४२२००९.
*जन्मतारीख* : १८ डिसेंबर १९६९.
*ईमेल* : caphalke69@gmail. com

——————————————–

प्रतिक्रिया व्यक्त करा