You are currently viewing सिंधुदुर्ग कला महाविद्यालयाच्या कलाप्रदर्शनाचा शुभारंभ

सिंधुदुर्ग कला महाविद्यालयाच्या कलाप्रदर्शनाचा शुभारंभ

प्रदर्शन ६ फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध; आज आंतरशालेय चित्रकला स्पर्धा

कणकवली

सिंधुदुर्ग कला महाविद्यालयाची २७ वर्षे यशस्वी वाटचाल सुरू असून या संस्थेतील विद्यार्थी कलाशिक्षक, कला दिग्दर्शक व व्यावसायिक कलाकार म्हणून कार्यरत आहेत. आमची मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट ( मुंबई ) या माध्यमातुन विनाअनुदानित चित्रकला महाविद्यालय चालविण्यत येते. या कला संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक, चित्रकला स्पर्धा, कला प्रदर्शन, कला शिबिर तसेच निसर्ग चित्र स्पर्धा, मान्यवर कलाकारांची प्रात्यक्षिके प्रदर्शने आयोजित करत असते. येत्या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालयातील विद्यार्थी चित्रकला प्रदर्शन – २०२३ आयोजित करण्यात आले आहे.

या वार्षिक कलाप्रदर्शनाला २ फेब्रुवारी २०२३ रोजी कोकण हेरिटेज कुडाळचे गजानन गंगाराम कुडाळकर, ज्येष्ठ पत्रकार संतोष वसंत वायंगणकर, मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट, मुंबईचे विश्वस्त ध्रुव नितीन जाधव,कोकण हेरिटेज कुडाळ विश्वस्त मोनीष गजानन कुडाळकर अनंत राबांडे , संस्थेचे संस्थापक नितीन बाळकृष्ण जाधव, प्राचार्य अनिल दावल,करंदीकर कला अकॅडमी प्राचार्य चंद्रकांत धुरी हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील वार्षिक गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आली. हे प्रदर्शन ६ फेब्रुवारी २०२३ सकाळी १० ते सायंकाळी ४.३० पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. सदर प्रदर्शन कालावधीमध्ये आंतरशालेय चित्रकला स्पर्धा ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते १२.३० या कालावधीत घेण्यात येणार आहे. अशा प्रदर्शनाला कलाशिक्षक, विद्यार्थी, कलाप्रेमी, कलारसिक नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रचंड प्रतिसाद लाभला. तसेच पुढील चार दिवसातील स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा