शिवसेनेच्या वतीने साटेली भेडशी रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन १५ फेब्रुवारी रोजी
दोडामार्ग
दोडामार्ग मध्ये दोन दिवसापूर्वी गरोदर मातेला उपचारासाठी पुढे नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती, वेदनेने ती माता विव्हळत होती. शिवसेना उप जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी तात्काळ खाजगी गाडी उपलब्ध करून पुढे नेण्याची व्यवस्था केली होती. धुरी यांनी त्याच वेळी रुग्णवाहिकेसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता, आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाल्याने नवीन रुग्णवाहिका रुग्णालयात दाखल झाली. बाबुराव धुरी यांच्या मागणीला यश मिळाले आहे.
साटेली भेडशी येथील रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या वतीने होणार असल्याची माहितीही बाबुराव धुरी यांनी दिली आहे.यावेळी तालुकाप्रमुख संजय गवस, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, आनंद रेडकर, संदेश वरक, संदेश राणे, संजय नाईक आदी उपस्थित होते.