कणकवली
येथील अद्वैत फाऊंडेशन संस्थेला डोंबिवली येथील हेल्पिंग हँडस वेलफेअर सोसायटी डोंबिवली यांचा नवरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानचिन्ह,शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते ५ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता डोंबिवली येथे पुरस्कार वितरण केले जाणार आहे.
यावेळी आमदार ॲड. यशोमती ठाकूर, वृत्तनिवेदीका अनुपमा खानविलकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.