You are currently viewing मोबाईल अँप व्दारे ई-पीक पाहणी नोंदणी करिता 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ

मोबाईल अँप व्दारे ई-पीक पाहणी नोंदणी करिता 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ

मोबाईल अँप व्दारे ई-पीक पाहणी नोंदणी करिता 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ

सिंधुदुर्गनगरी

 रब्बी हंगाम 2023 ची मुदत दि. 31 जानेवारी 2023 रोजी पर्यंत होती. तथापि मान्सून उशिरापर्यंत लांबल्यामुळे रबी हंगामाची उशिराने पीक पेरणी झाली आहे. जिल्हा पातळीवरुन क्षेत्रीय अधिकारी यांनी रब्बी हंगाम मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केल्याने रब्बी हंगाम 2023 मोबाईल अँप व्दारे ई-पीक पाहणी नोंदणी करिता दि. 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. अशी माहिती कुळवहिवाट शाखेचे नायब तहसिलदार संतोष खरात यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा