You are currently viewing अजित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल….

अजित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल….

मुंबई :

 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थकवा व अंगात कणकण असल्यानं दोन दिवसांपूर्वी ते होम क्वारंटाइन झाले होते.

 

 

अजित पवार यांना अतिवृष्टग्रस्त भागांचा दौरा करून आल्यानंतर  थकवा जाणवत होता. खबरदारी म्हणून त्यांनी करोनाची चाचणीही केली होती. ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतरही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते घरीच होते. त्यांनी शासकीय बैठका व पक्षपातळीवरील कार्यक्रमही रद्द केले होते. मात्र, घरातून त्यांचं कार्यालयीन कामकाज सुरू होतं.

 

अजित पवारांना करोनाची लागण झाल्याचीही चर्चा होती. मात्र, त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी ती फेटाळली होती. मात्र, त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा