You are currently viewing अंगणवाडी सेविकांचे काम बंद आंदोलन..

अंगणवाडी सेविकांचे काम बंद आंदोलन..

 

राज्यातील अंगणवाडी सेविका आपल्या न्याय मागण्यासाठी काम बंद आंदोलन करणार आहेत. येत्या २० फेब्रुवारीपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मानधन, अंगणवाडय़ांचे भाडे, आहाराच्या दरात वाढ नाही, सेवा समाप्ती लाभ, आजारपणाच्या रजा नाहीत, हक्काच्या उन्हाळी सुट्टय़ा बंद, नवीन मोबाइलसाठी आंदोलन करूनही दखल नाही, सदोष ट्रॅकर अॅप, अशा समस्या वारंवार मांडूनही शासनाने दखल न घेतल्याने राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी २० फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारकडून फक्त आश्वासने देण्यात येतात. मात्र अंगणवाडी सेविकांच्या साध्या मागण्या पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून मानधनामध्ये साडेपाच वर्षांपूर्वी तर केंद्र सरकारकडून साडेचार वर्षांपूर्वी मानधनामध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मानधनासह अन्य मागण्यांसाठी आता अंगणवाडी सेविकांनी अटीतटीची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा