*सार्वत्रिक निवडणुक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पाची मांडणी*
२०२४ची लोकसभेची निवडणूक ही सत्ताधारी भाजपा साठी करो वा मरोची लढाई असून त्या अनुषंगाने आज केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्पाच प्रतिबिंब आपल्याला पहायला मिळत.
*बजेटमध्ये सात लाखापर्यंतच्या उत्पन्नाची वाढवलेली मर्यादा यामुळे मध्यमवर्गीयाना मोठा दिलासा मिळालेला असून खुप वर्षांची मागणी पूर्ण झाली ही या बजेटमधील सर्वात समाधानाची बाब आहे.
*वैद्यकीय क्षेत्रातील अनेक घोषणा स्वागतार्ह असून त्याची अंमलबजावणी कितपत होईल हे पहाणे महत्त्वाचे ठरेल. वैद्यकीय क्षेत्राप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हानांचा विचार करून डिजिटल क्लास व डिजिटल लायब्ररी सारखे नवनवीन प्रयोगही भविष्यात काहीतरी सकारात्मक बदल होतील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही.
*जागतिक मंदी असताना मांडलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक नसला तरी निराशाजनक नाही*
.. अॅड. नकुल पार्सेकर
संस्थापक अध्यक्ष, अटल प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग