You are currently viewing जीआयएस आधारित वेब प्रणालीचे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या हस्ते उद्घाटन

जीआयएस आधारित वेब प्रणालीचे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ च्या संदर्भात उत्खनन/खंदक परवानग्या मिळविण्यासाठीची प्रक्रिया आणि वेळ कमी करण्यासाठी, विविध भौगोलिक माहिती प्रणालीच्या स्तरांमध्ये उत्खनन / खंदक परवानग्याशी संबंधित विभागाची माहिती संग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई क्षेत्राला विदयुत पुरवठा करण्याच्या तरतुदीसाठीचा इलेक्ट्रिक केवल नेटवर्कशी संबंधित बेस्टच्या विदयुत पुरवठा विभागाचा डेटा बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जी टेक जी आय एस डेटाचे, ArcGIS / ArcFM मध्ये स्थलांतर करण्यासाठी आणि फील्ड वापरकर्त्यांसाठी वेब प्रणाली विकसित करण्याचे ठरविण्यात आले होते.

त्यानुसार ArcGIS / ArcFM GIS आधारित वेब प्रणाली आणि मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. सदर अॅप्लिकेशन बेस्ट विदुयत पुरवठा विभागाच्या इलेक्ट्रिकल नेटवर्क मालमत्ता आणि भूमिगत केबल नेटवर्कबद्दल तपशीलवार माहिती देईल आणि उत्खनन योजना तयार करण्यासाठी उत्खनन करण्यापूर्वी इतर भूमिगत सेवा ओळखण्यासाठी सुलभ ठरेल. हे अॅप्लिकेशन बेस्ट उपक्रमाच्या इलेक्ट्रिकल नेटवर्कशी संबंधित विविध अहवाल काढण्याची सुविधा प्रदान करेल. वेब अॅप्लिकेशन फील्ड वापरकर्त्यांच्या मोबाइल आणि डेस्कटॉपवर उपलब्ध असेल. हे सॉफ्टवेअर स्मार्ट मीटरिंग, एडीएमएस, ईआरपी, सीआरएम, आउटेज मॅनेजमेंट सिस्टम इत्यादीसारख्या बेस्टच्या आगामी प्रकल्पासह एकत्रित केले जाऊ शकते, जे बेस्टला इलेक्ट्रिकल नेटवर्क बिघाडाचे अचूक पिन पोइंटिंग करण्यात मदत करेल आणि त्यानंतर वीजपुरवठा बंद कालावधी कमी करेल, ज्यामुळे ग्राहकांना खूप मदत होईल.

दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी AreGIS / ArcFM GIS आधारित वेब अॅप्लिकेशन आणि मोबाइल ॲप में. इएसआरआयचे उद्घाटन बेस्ट उपक्रमाचे माननीय महाव्यवस्थापक तथा प्रशासक लोकेश चंद्र यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा