You are currently viewing सावंतवाडी जेलमधून फरार संशयित तब्बल दीड वर्षांनी पोलिसांच्या ताब्यात

सावंतवाडी जेलमधून फरार संशयित तब्बल दीड वर्षांनी पोलिसांच्या ताब्यात

सावंतवाडी

अल्वपयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणात सावंतवाडीतील “कॉरंटाईन जेल” मधून पळून गेलेल्या संशयिताला गोवा पोलिसांनी तब्बल दीड वर्षानंतर अटक केली. ही कारवाई मडगाव पोलिसांकडून करण्यात आली आहे. याबाबतचा गुन्हा सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो कोरोनाकाळात सुरू असलेल्या कोलगाव आयटीआयमध्ये न्यायालयीन कोठडीत होता. परंतू त्यावेळी खिडकीचे गज तोडून तो पळून गेला होता. प्रमोद मधूकर परब (४८) रा. कुडाळ, असे त्याचे नाव आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी सावंतवाडी पोलिस गोवा येथे गेले आहेत. तर उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे सावंतवाडीचे प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी सांगितले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा