You are currently viewing कणकवलीत एअरटेलच्या ट्रक टॉवर उभारणीचे काम सुरू

कणकवलीत एअरटेलच्या ट्रक टॉवर उभारणीचे काम सुरू

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा पाठपुरावा

गटनेते संजय कामतेकर, सत्ताधारी नगरसेवकांनी घेतला कामाचा आढावा

कणकवली

कणकवली शहरातील एअरटेलचा बंद असलेला टॉवर अखेर नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या पाठपुराव्यातून सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवली शहरवासीयांना एअरटेल नेटवर्कची समस्या जाणवू लागल्यानंतर याबाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. तसेच तातडीने याबाबत कार्यवाही करत शहरवासीयांची गैरसोय दूर करा अशी मागणी केली होती. त्यानुसार आज कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील दत्त मंदिर जवळ ट्रक टॉवर उभारणी करण्याचे काम सुरू करण्यात आले. या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा करणारे गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे यांच्यासह बाळा सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी दत्त मंदिर जवळ भेट देत या संदर्भात कामाचा आढावा घेतला. तसेच लवकरात लवकर हा ट्रक टॉवर सुरू करण्यात यावा व शहरवासी यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी देखील करण्यात आली. यावेळी दोन दिवसात हा टॉवर सुरू केला जाईल अशी ग्वाही कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती गटनेते संजय कामतेकर यांनी दिली. दरम्यान या ट्रक टॉवर मुळे कणकवली शहरातील बांधकरवाडी, कनक नगर, वरचीवाडी यासह अन्य भागातील एअरटेल नेटवर्क ची समस्या दूर होणार असल्याने नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा