You are currently viewing सरपंच चषक कोचरा मायनेवाडी २०२३ चा मानकरी ठरला छत्रपती स्पोर्ट्स म्हापण तर केसीसी मालवण वायरी उपविजेता..

सरपंच चषक कोचरा मायनेवाडी २०२३ चा मानकरी ठरला छत्रपती स्पोर्ट्स म्हापण तर केसीसी मालवण वायरी उपविजेता..

सरपंच योगेश तेली यांच्या प्रेरणेतून श्रीदेव वेतोबा मायनेवाडी मंडळाने केले दिमाखदार आयोजन..

वेंगुर्ला

सरपंच चषक कोचरा मायनेवाडी २०२३नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट हि स्पर्धा २६,२७ व २८ जानेवारी २०२३ या कालावधीत कोचरा मायनेवाडी मैदानावर संपन्न झाली. या स्पर्धेत अंतिम सामन्यात अटातटीच्या लढतीत संघमालक सचिन रावले व नाना केळुसकर यांचा संघ छत्रपती स्पोर्ट्स म्हापण संघाने केसीसी मालवण वायरी या संघावर मात करत सरपंच चषकावर आपले नाव कोरले.

स्पर्धेतील उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून मालवण संघाचा खेळाडू मुन्ना फाटक याची निवड करण्यात आली. उत्कृष्ठ फलंदाज म्हणून म्हापण संघाचा खेळाडू सिद्धेश चौधरी यांची निवड करण्यात आली तर मालिकावीराचा बहुमान मालवण संघाच्या अष्टपैलू खेळाडू गुणेश हडकरने पटकावला. अंतिम सामना सामनावीर म्हणून म्हापणच्या सुशील बंगेची निवड करण्यात आली.

कोचरा गावचे नवनिर्वाचीत लोकनियुक्त सरपंच योगेश तेली यांच्या प्रेरणेतून श्रीदेव वेतोबा मायनेवाडी मंडळाने या स्पर्धेचे आयोजन अगदी दिमाखदार केले. आयोजनावर खूश होवुन येत्या दीड महिन्यात याच मैदानावर आमदार चषक भरवण्याची इच्छा सरपंच योगेश तेली यांनी बक्षिस वितरण समारंभात व्यक्त केली.

समलोचाक म्हणून निखिल पाटकर, सुनील करवडकर व समीर चव्हाण यांनी काम पाहिले.

बक्षीस वितरणावेळी मान्यवर कक्षात कोचरा गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्वे, मंडळाचे कार्यकर्ते व मायनेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा