You are currently viewing संजीवनी

संजीवनी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*संजीवनी*

गीत तुझे हृदयात
मनोभावे जपलेले
नवे गीत गाण्यासाठी
शब्द नच सूचलेले

मती कुंठित जाहली
शब्द कण गोठलेले
मार्ग अता शोधू कसा
नाही मज कळलेले

अंतरीच्या गुढ गर्भी
खोल खोल दडलेले
काळजाच्या कप्प्यामध्ये
अंतरंगी लपलेले

मन माझे अजूनही
आठवात रमलेले
जरा बसता एकांती
नेत्र तळे भरलेले

अबोलशा वेदनेत
अजूनही पोळलेले
शब्द शीतल चांदणे
चंदनच जाहलेले

लेखणीस यश देई
शारदेस विनवले
संजीवनी मम सखी
पुन: पुन्हा प्रार्थीयले

भारती महाजन-रायबागकर चेन्नई

9763204334

प्रतिक्रिया व्यक्त करा