*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे ज्येष्ठ लेखक कवी माधव सातपुते (विगसा) लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कवचकुंडले*
************
कृपाळू जन्मदाते
कवचकुंडले माझी
जन्मुनी तृप्तलो मी
इछ्या नुरली काही
भोगले ऐश्वर्य सारे
कृपावंती स्पर्ष सारे
उरी भावना निष्पाप
आज याचना नाही
भाव भक्तिचा नुर
तल्लीन अंतरात्मा
नेत्री ओघळते तृप्ती
सारी तृप्तीची नांदी
सुख कल्याणकारी
शोध आत्मानंदी
नित्य घेत राहावा
याविण जगणे नाही
****************
*रचना क्र .३६१/ २९/१२ /२०२२.*
*©️वि.ग.सातपुते. (भावकवी)*
📞 *(9766544908)*