मालवण
मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने १० लाख पारितोषिक रक्कमेच्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक’ या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या भव्य स्वरूपातील दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे ८ ते १२ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. अशी माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण शाखा कार्यालय येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी शहर प्रमुख नंदू गवंडी, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, मंदार केणी, यतीन खोत, पंकज सादये, महेश जावकर, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, सुहास वालावलकर, संमेश परब, अन्वय प्रभू, राका रोगे, सिद्धेश मांजरेकर, उमेश चव्हाण, फारूक मुकादम, साजिद बांगी, प्रथमेश राऊत, किरण वाळके, उमेश मांजरेकर, करण खडपे, चेतन खोत, बंटी केरकर, नाना नाईक, शाम वाक्कर यासह अन्य उपस्थित होते. या स्पर्धेच्या निमित्ताने मालवणात सर्वत्र भगवे वातावरण केले जाणार आहे.
स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक व ३ लाख ४८ रुपये, उपविजेत्या संघास भव्य चषक व १ लाख ५० हजार ४८ रुपये व वैयक्तिक स्तरावरील अन्य पारितोषिके असणार आहेत. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून स्पर्धा आयोजन होणार आहे. अशी माहिती श्री. खोबरेकर यांनी दिली.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी नावनोंदणी व अधिक माहितीसाठी स्पर्धा अधिकारी बंटी केरकर मोबा. ९६३७२३२१९२ यांच्यासह शाम वाक्कर, सुनील मालवणकर, किरण वाळके यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. खोबरेकर यांनी केले आहे.