You are currently viewing सावंतवाडी वनविभागाची दिमाखदार कामगिरी

सावंतवाडी वनविभागाची दिमाखदार कामगिरी

*कुंडल वन अकादमी येथे आयोजित व वनवृतस्तरीय क्रीडा स्पर्धेत तब्बल ३५ पदके पटकावली*

 

*उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा सन्मान*

 

सावंतवाडी :

 

कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक श्री एम रामानुजन यांच्या प्रमुख उपस्थिती स्पर्धा पार पडली. चालू वर्षी सावंतवाडी वनविभागाच्या स्पर्धकांनी ॲथलेटिक्स, गोळा फेक, बुद्धिबळ, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल इत्यादी क्रीडा प्रकारांमध्ये पदक मिळवत उत्तम कामगिरी केली. यामध्ये श्री ब्रह्मकुमार भोजने वनरक्षक कोलगाव (उ.) यांनी “ॲथलेटिक्स चा राजा” हा पुरस्कार मिळवला. श्री संग्राम पाटील वनरक्षक (इन्सुली) तसेच ५९ वर्षाचे श्री गोविंद सावंत वनमजूर (आंबेरी नाका कुडाळ) यांनी एकूण ६ पदके मिळवत “मॅन ऑफ द टूर्नामेंट” हा किताब मिळविला.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्व पदक विजेत्या खेळाडूंना प्रशस्तीपत्र देऊन उपवनरक्षक सावंतवाडी श्री. एस. नवकिशोर रेड्डी यांच्या हस्ते विभागीय कार्यालय सावंतवाडी येथे गौरविण्यात आले. तसेच राज्यस्तरावर वन संरक्षणाची कामाकरिता रजत पदक विजेते श्री सावळा कांबळे वनपाल मठ वेंगुर्ला यांचाही गौरव करण्यात आला.

यावेळी श्री. रेडी म्हणाले वने व वन्यजीवांचे संरक्षण संवर्धन करीत असताना वन अधिकारी, कर्मचारी यांचे मध्ये सांघिक भावना निर्माण होऊन त्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळून स्वास्थ्य चांगले राहावे, या हेतूने विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात असल्याचे सांगून वन संरक्षणाच्या कामांमध्ये देखील वनकर्मचारी, अधिकारी यांनी अशीच दैदिप्यमान कामगिरी करून विभागाची प्रतिमा उंचवावी.

ही स्पर्धा श्री. एस. नवकिशोर रेड्डी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स. बा. सोनवडेकर सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री अमृत शिंदे, श्री मदन शिरसागर, श्री अमित कटके, श्री अरुण कन्नमवार, श्री राजेंद्र घुणकीकर व श्रीम. विद्या घोडके यांनी यशस्वी केली.