You are currently viewing बांदा पतंजलीच्या वतीने 108 सूर्यनमस्कार शिबीर संपन्न

बांदा पतंजलीच्या वतीने 108 सूर्यनमस्कार शिबीर संपन्न

बांदा

पतंजली योग समिती बांदा आणि पतंजली योगसमिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा च्या भव्य पटांगणावर रथसप्तमी निमित्ताने 108 सूर्यनमस्कार शिबिर चे आयोजन करण्यात आले . आंतरराष्ट्रीय सुर्यनमस्कार दिनाचे अर्थात रथसप्तमी चे औचित्य साधून सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले.


माजी शिक्षण आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बांदा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शामराव काळे व उपस्थित मिन्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी पतंजली योग समिती सिंधुदुर्ग चे सहजिल्हा प्रभारी शेखर बांदेकर, बांदा ग्रामपंचायत सरपंच प्रियांका नाईक , व्ही .एन. नाबर चे मुख्याध्यापक सौ मनाली देसाई,भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी महेश भाट, किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी सुभाष गोवेकर, लक्ष्मण पावसकर, प्रियांका हरमलकर, दत्तात्रय निखार्गे, उत्तम देसाई, अभिलाष देसाई आदी उपस्थित होते. दिप प्रज्वलनाने उद्घाटन झाल्यानंतर 108 सूर्यनमस्कारचेश शिबीर शेखरजी बांदेकर यांनी घेतले. सदर शिबिरास पतंजली योगसमिती बांदा, पतंजली योगसमिती डेगवे व बांदा पंचक्रोशीतील योगसाधक उपस्थित होते .या शिबिरात खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.1 व व्ही .एन नाबर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल च्या व्यवस्थापकांनी सदर शिबिरासाठी लागणारे स्टेज, साउंड सिस्टीम आणि जागा मोफत उपलब्ध करून दिली. योगाभ्यास करणे ही काळाची गरज आहे असे प्रमोदजी कामत यांनी सांगितले.सदर उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी बांदा पतजंलीच्या योगसाधकांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा