You are currently viewing जुगाराचा बादशाह फोंडा घाटाखालच्या आप्पाचे गोवा बनावटीच्या दारूचे कनेक्शन….

जुगाराचा बादशाह फोंडा घाटाखालच्या आप्पाचे गोवा बनावटीच्या दारूचे कनेक्शन….

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैद्य धंद्यांनी उच्छाद मांडलेला आहे. अवैद्य धंद्यांवर वचक ठेवणारे संबंधित खाते अवैद्य धंदेवाल्यांकडे चाकरीस असल्यासारखे वागतात त्यामुळे अवैद्य धंदेवाले दिवसेंदिवस गब्बर होत चालले आहेत आणि अवैद्य धंद्यांकडे वळणाऱ्यांची संख्या देखील वाढत असून त्याला कारणीभूत या धंद्यांना संरक्षण देणारे संबंधित खातीच आहेत.

दारू, जुगार, मटका सारख्या अवैद्य धंद्यांना संबंधित खात्यानंकडून संरक्षण, मदत मिळत असल्याने फोंडा घाटाच्या खालच्या गावातील जुगाराचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा दात पडलेला आप्पा दारूच्या धंद्यातही सराईत असून गोवा बनावटीच्या दारूचे कोल्हापूर, रत्नागिरी, कर्नाटक इत्यादी तो मोठ्या प्रमाणावर दारूची अवैद्य वाहतूक करतो. गोवा बनावटीच्या दारूच्या व्यवसायाशी संबंधित असलेला दात पडलेला आप्पा हा कणकवलीतील जुगाराचा बादशाह टिंगल कॉन्टेरो याचा जुगाराच्या तक्षीमितील पार्टनर आहे.
अवैद्य दारूच्या व्यवसायात बक्कळ पैसा आणि संपत्ती कमावलेला आप्पा अवैद्य धंद्यांबरोबर अनेक नाद बाळगतो. एका फळ विक्रेत्या महिलेशी देखील त्याचे अनैतिक संबंध आहेत. अवैद्य दारूच्या धंद्यातून येणारे पैसे हे दारू व्यावसायिक अशाप्रकारे बाईचे नाद बाळगून उडवत असतात, आणि त्यातूनच आंबोली घाटातील फेकलेल्या मृतदेहासारखी प्रकरणे जन्म घेतात. परंतु तरीही या व्यवसायांना आळा घालणारी संबंधित खाती मात्र हाल मे खुशाल जीवन जगतात आणि गलेलठ्ठ सरकारी पगार आपल्या बँक खात्यात थप्पी मारून ठेवतात.
दारू धंद्यांना आळा घालण्यासाठी सरकारने स्पेशल नियुक्त केलेले उत्पादन शुल्क खाते काम करते की अवैद्य दारू व्यावसायिकांकडून फक्त खातेच की काय? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे. फोंडा घाटाखाली राहणारे दात पडलेल्या आप्पा सारखे असे कितीतरी दारू व्यावसायिक या खात्यांच्या आशीर्वादावर अगदी बिनधास्तपणे दिवसाढवळ्या दारूची वाहतूक करून गोव्यापासून रत्नागिरी, कोल्हापूर, आणि अगदी कर्नाटक पर्यंत दारू पोचवतात तरीही पैसा कमावून नामानिराळे राहतात. अशा लोकांवर कधी कारवाई होणार की हे अवैध धंदे सुरूच ठेऊन दारू व्यवसायिकांसोबत संबंधित खात्यातील अधिकारी सुद्धा गब्बर होतंच राहणार?

प्रतिक्रिया व्यक्त करा