*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मराठीचा अभिमान …*
गर्व मराठीचा आम्हा पुरेपुर अभिमान
आनबान मराठी हो महाराष्ट्राची ती शान…
आम्ही बोलतो मराठी आम्ही चालतो मराठी
नसानसात मराठी
माय मराठी म्हणता गोड गोड पडे मिठी…
माय मराठी अमृत चिरंजीव करे बोली
सागराहूनही खोल असे पहा तिची खोली…
माय सह्याद्रीचा कडा माय हिमालय खडा
काळ्या दगडाची रेघ
नाही पडत अंतर नाही पडत हो भेग …
माय सुर्याची हो प्रभा तिची देशोदेशी हवा
माय शीतल चांदणं
मनामनाला आवडे मराठीचं हे नांदणं..
किती झाले हो शाहीर मराठीत ते माहिर
ज्ञानदेव तुकाराम
आहे आवाका प्रचंड जणू उभा हिमखंड
दिसताच राम राम …
नाही पुरणार शाई आकाशाचा ही कागद
माय मराठी अफाट
हिची सौंदर्य स्थळे नि हिचा खासच हो थाट…
मनमनात जपावी हिला खूप वाढवावी
झेंडा विश्वविद्यालयी
प्राणप्रिय हो आम्हाला आहे मराठीच आई…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २३/१/२०२३
वेळ : सकाळी ९/११