You are currently viewing सत्यवानाची सावित्री बनण्यापेक्षा, “जोतिबांची सावित्री बनणे” आजच्या काळाची गरज आहे. – ऍड. स्वाती तेली

सत्यवानाची सावित्री बनण्यापेक्षा, “जोतिबांची सावित्री बनणे” आजच्या काळाची गरज आहे. – ऍड. स्वाती तेली

विधवा स्त्रियांना सुद्धा सन्मानाने वागवले पाहीजे – गितांजली नाईक

प्रजासत्ताक दिनानिमित्त ओसरगाव येथे ”महिलांचा स्नेहसंमेलन व तिळगुळ समारंभ कार्यक्रम

‘ साद फाउंडेशन,सिंधुदुर्ग चे आयोजन.

कणकवली.

भारतीय संविधानामध्ये स्त्रियांच्या प्रगतीसाठी महिलांविषयक तरतूदी आणि कायदे करण्यात आलेले असून स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता या मूल्यांचा ही समावेश केला आहे. स्त्रियांना ही समाजामध्ये सन्मान आणि प्रतिष्ठापूर्वक जगण्यासाठी ही मूल्ये आवश्यक आहेत. स्त्रियांची प्राचीन काळापासून खूपच वाईट अवस्था होती ती आज ही तशीच झाली असती, आज जे काही स्त्रियांना स्थान आणि मान आहे तो केवळ ज्योतिबा फुले आणि सवित्रीमाई फुले यांच्या मुळे म्हणून आपण सत्यवानाची सावित्री बनण्यापेक्षा ज्योतिबाची सावित्री बणने काळाची गरज आहे असे मत ऍड. स्वाती तेली यांनी साद फाउंडेशन आयोजित ओसरगाव येथील कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना व्यक्त केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त महिलांचे स्नेहसंमेलन व तिळगुळ समारंभ आयोजित करून स्त्रियांना त्यांच्या हक्क ,अधिकार , कर्तव्ये यासाबंधी कायदेविषयक मार्गदर्शन सत्राचे आयोजन साद फाउंडेशन, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने पूर्ण प्राथमिक शाळा,कानसळीवाडी ,ओसरगाव येथे करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापिका शीतल ठाकूर मॅडम, नंदकिशोर हरमळकर गुरुजी,उपसरपंच गुरूदास सावंत, साद च्या अध्यक्षा गितांजली नाईक, युनिक अकॅडमी कणकवली संचालक सचिन कोर्लेकर,ऍड.स्वाती तेली, उद्योजिका वर्षा तळेकर, प्रा.अपूर्वा गोलतकर, डिगस शाळेचे मुख्याध्यापक विलास गोसावी सर, सेजल मॅडम, सर्व महिला व विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


ऍड. तेली मॅडम पुढे म्हणाल्या की, महिलांसाठी कायदे बनवले गेले आहेत त्याचा वापर योग्य वेळी योग्य ठिकाणी कारायलाच हवा. महिलांनी अन्याय, अत्याचार सहन करू नये ,संविधानाने महिलांना त्यांचे हक्क अधिकार दिले,
तसेच आपण नटून थटून दागीने घालून विवाहित स्त्रिया जो हळीकुंकू समारंभ साजरा करतात तो विधवा महिलांचा अपमान करणारा आहे का? असा प्रश्न पडतो कारण स्त्री म्हटली की ती कुठलीही असली तरी स्त्री असते. नवरा मरणे हा तिचा दोष नसतो त्यामुळे या सर्व महिलांना कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचं महत्वाचं काम हे कुटुंबातील महिलांनी करायला हवं. तसेच या महिलांची मानसिकता बदलणेही गरजेचे आहे.

यावेळी कार्यक्रमाची अध्यक्षता करताना साद फाउंडेशन च्या अध्यक्षा आणि कुडाळ नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक म्हणाल्या, साद फाउंडेशन सिंधुदुर्ग च्या वतीने हा कार्यक्रम घेण्याचा उद्देशच हा आहे की, स्त्रिया त्यांच्या अधिकाराबद्दल जागरूक झाल्या पाहिजेत ,आपल्या संविधानाने स्त्री-पुरुष समानता तत्व स्वीकारले आहे त्या प्रमाणे स्त्री पुरुष यांनी परस्परांशी आदर व सन्मानपूर्वक वर्तन ठेवायला हवे. स्त्रियांनी आपल्या मुलांबरोबरच मुलींनाही उच्च ध्येय ठेवून शिक्षित केले तर मुलीसुद्धा मोठया पदावर पोहोचतील. आज विधवा स्त्रियांना जी वागणूक मिळते ती मानसिकता खूपच वेदनादायक आहे. विधवा स्त्रियांना ही सन्मानाने वागवले पाहीजे.त्यांना आपल्या मध्ये सामील करून घेतले पाहीजे म्हणजे त्या माता भगिनी आपल उर्वरित आयुष्य समाधान आणि आनंदाने जगतील. अनेक रूढी परंपरा यामध्ये अडकलेल्या भारतीय समाजात पुरुषां पेक्षा स्त्रियांवरच जास्त जबाबदाऱ्या दिसतात. तीने आज ही चुल आणि मुल याकडेच लक्ष द्यायला हव तसेच पुरुषांनी स्त्रियांना त्यांच्या कामात मदत केली तर पुरुषांना हिणवले जाते ही कुठली मानसिकता? याचा विचार करायला हवा. यामुळे आपल्या देशासह, गावागावात अशा अनेक विषयांवर चिंतन आणि प्रबोधन होणे गरजेचे आहे.

याप्रसंगी साद च्या माध्यमातून सर्व महिलांना एक झाडाचे रोपटे व तिळगुळ देऊन सन्मान केला गेला. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्र लहानपणापासूनच समजून घेतलं पाहीजे यासाठी राजमुद्रा, युपीएससी, मी आणि तुम्ही, मुलांना घडवताना अशी तीन पुस्तके शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल ठाकूर मॅडम , नंदकिशोर हरमळकर गुरुजी यांच्याकडे भेट स्वरूपात देण्यात आली.

आज जे मार्गदर्शन करण्यात आले ते सर्व स्त्रियांनी आचरणात आणावे आणि साद ने दिलेले छोटेसे झाड आपल्या घरा शेजारी लावून ते मोठे करा त्याचप्रमाणे आपली मुल सुद्धा गितांजली नाईक मॅडम यांच्या प्रमाणे प्रशासनात येण्यासाठी त्यांच्या आईने मेहनत घेतली तसे तुम्ही सुद्धा प्रयत्न करावेत असे आवाहन प्रा.अपूर्वा गोलतकर यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या ऍड.स्वाती तेली मॅडम यांनी सर्व कायदे व्यवस्थित आणि ग्रामीण भागातील महिलांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितले त्यावर सर्व महिलांना कायदेविषयक माहिती मिळाल्याचा आनंद दिसत होता हे कार्यक्रमाचे विशेष होते.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योजिका वर्षा तळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन व सर्वांचे आभार नंदकिशोर हरमळकर सर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा