सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. सदर योजनेसाठी वैशिष्ठ्ये व पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत. या योजनेअंतर्गत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. वैयक्तीत मधपाळ, केंद्र चालक प्रगतशील मधपाळ हे प्रमुख घटक व पात्रता आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्ग, तहसीलदार कार्यालयासमोर, कुडाळ, दूरध्वनी क्रमांक 02362-222220, 9420962105 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.