You are currently viewing जाईन म्हणतो मी केजीला

जाईन म्हणतो मी केजीला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*जाईन म्हणतो मी केजीला*

उठला पाडा तडक धावला
मालका मागून शेतात गेला
म्हणू लागे आपल्या धन्याला
*जाईन म्हणतो मी केजीला*

भूत इंग्रजीचे कधी पछाडले
कळले नाही त्या मालकाला
दुरून *गोरी* गाय हंबरली
हाक मारली तीने पाड्याला

गुरे कां कोठे जातात शाळेत
प्रश्न गाईने त्यास विचारला
आठवून सारी कालची गोष्ट
पाड्याने सुध्दा विचार केला

काल शहराकडे गेलो होतो
*गोशाळा* तेथे लिहीले होते
वाचली पाटी परतत असता
मीही शिकेन *जाऊन* तेथे

घालू लागली समजूत त्याची
उद्योग न काढी स्वतः कोणी
उपयोग नसतो शिकून काही
शिकलेले सुध्दा वहाती गोणी

नको कराया कामे *कष्टाची*
म्हणून शिकती सर्व माणसे
स्वतः सारे स्वतःस विकती
म्हणून होते जगभर *हंसे*

विनायक जोशी 🥳ठाणे
मीलनध्वनी/९३२४३२४१५७
३४/गुरूवार/१९ जानेवारी २३

प्रतिक्रिया व्यक्त करा