कणकवली :
कणकवली तालुक्यातील बोर्डवे प्रति वर्षाप्रमाणे श्री कालिका देवी मंदिरात शनिवार २८ जानेवारीला रथसप्तमी उत्सव मोठ्या उत्साव साजरा होणार आहे.
रथसप्तमी उत्सव मोठ्या उत्सावानिमित्त शनिवारी २८ जानेवारीला सकाळी ९.०० ते १२.००, अभिषेक देवीची पूजा आरती प्रसाद, दुपारी १.००ते २.०० महाप्रसाद, दुपारी २.००वाजल्यापासून ओटी भरणे, रात्रौ. ८.०० ते ९.०० वाजता श्री कालिकादेवी प्रासादिक महिला बचत मंडळ फोंडाघाट बुवा कु.तनया तुकाराम तीवरेकर, पखवाज कु.गौरव संतोष शेंडे, रात्रौ ९.००ते १०.०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम समस्त कासार समाज, रात्रौ१०.०० ते ११.०० वाजता कालिका अंक प्रकाशन सोहळा, रात्रौ ११.००ते १२.३० वाजता बक्षीस वितरण व सत्कार समारंभ, रात्रौ १.०० वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळ यांचे महान पौराणिक नाटक, तसेच रविवार दिनांक २९जानेवारी सकाळी ८.०० वाजता लघुरुद्र अभिषेक, सकाळी ९.०० वाजता पासून भाविकांच्या इच्छित एकादशनी, सकाळी ९.३० ते १०.०० वाजता महिलांचा हळदीकुंकू समारंभ, सकाळी १०.०० वाजता समस्त कासार समाज श्री कालिकादेवी देवस्थान कमिटी, वार्षिक सर्वसाधारण सभा, दुपारी १.१५ वा. महाआरती, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४.०० वाजता समारोप, तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असं आवाहन समस्त कासार ज्ञाती समाज, श्री देवी कालिका देवस्थान कमिटी बोर्डवे यांच्या वतीने करण्यात आला आहे.