You are currently viewing राज्यात १३ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या!!

राज्यात १३ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या!!

महाराष्ट्र:

 

महाराष्ट्र राज्यात ऐकिकडे कोरोनाचं थैमान असताना दुसरीकडे पोलीस दलात सुरू असलेल्या बदल्यांवरून राजकारण होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावरून वादावादी सुरू असतानाच आता राज्य सरकारने राज्यातल्या एकूण १३ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये भंडारा, यवतमाळ, मुंबई, बुलढाणा, पुणे, नागपूर अशा सर्वच जिल्ह्यांचा समावेश आहे.

 

बदल्या झालेले IAS अधिकारी यांची माहिती खाली प्रमाणे –

 

1. व्ही एस मून, अध्यक्ष जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर यांची नियुक्ती आता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा येथे झाली आहे.

 

 

2. विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा यांची नियुक्ती सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ येथे करण्यात आली आहे.

 

 

3. एम बी वारभुवन यांची नियुक्ती सहसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

 

 

4. भाग्यश्री विसपुते, सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा येथे झाली आहे.

 

 

5. अमगोथू श्रीरंगा नायक, आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नागपूर यांची नियुक्ती सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई या ठिकाणी केली आहे.

 

 

6. ए जी रामोड, अध्यक्ष जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, उस्मानाबाद यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे येथे झाली आहे.

 

 

7. बुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा, यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूर करण्यात आली आहे.

 

 

8. शनमुगराजन एस, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती जिल्हाधिकारी वाशीम येथे झाली आहे.

 

9. मनिषा खत्री, सदस्य सचिव विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांची नियुक्ती महासंचालक वनामती, नागपूर येथे करण्यात आली आहे.

 

10. दिलीप बी हळदे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई यांची नियुक्ती संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे विभागात झाली आहे.

 

11. नवीन सोना, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई यांची नियुक्ती सदस्य-सचिव उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ मुंबई या ठिकाणी झाली आहे.

 

12. एबी उन्हाळे, यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई इथे करण्यात आली आहे.

 

13. अश्विनी कुमार, भाप्रसे यांची नियुक्ती, व्यवस्थापकीय महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ मुंबई या ठिकाणी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा