You are currently viewing ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा यांना “चंदन दर्डा साहित्य दीप” स्मृती पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा यांना “चंदन दर्डा साहित्य दीप” स्मृती पुरस्कार प्रदान

*ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा यांना “चंदन दर्डा साहित्य दीप” स्मृती पुरस्कार प्रदान*

*चैतन्य सभागृह, पवनानगर येथे पार पडला सोहळा*

चिंचवड-(प्रतिनिधी) –

स्वानंद महिला संस्था गेली पस्तीस वर्ष साहित्य क्षेत्रात काम करीत आहे . गेली अनेक वर्ष स्वानंद अंकामध्ये लिखाण करणाऱ्या स्वानंद भगिनी तसेच प्रतिवर्षी समाजात उत्तम काम करणाऱ्या तसेच दर्जेदार लिखाण करणाऱ्या साहित्यिकांना, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांना व लिहित्या हाताला प्रेरणा देण्यासाठी बळ देण्यासाठी पुरस्कृत करून त्यांच्यातील विश्वास द्विगुणित करण्याचं काम करत आहे.
स्वानंद अंकामध्ये गेली 18 वर्षे लिखाण करणाऱ्या, स्वतःची पुस्तके लिहिणाऱ्या अशा स्वानंद सारख्यांना ही पुरस्कृत करून त्यांची ऊर्जा द्विगुणित करण्यासाठी विविध पुरस्कार जाहीर केले जातात.


स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातून आलेल्या विविध साहित्य प्रकारांतून
ज्येष्ठ कवी श्री. बाबू डिसोजा राहणार निगडी,पुणे यांच्या “अस्वस्थ वर्तमानातील मी”या काव्यसंग्रहाला
” चंदन दर्डा साहित्य दीप ” स्मृती पुरस्कार ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली आणि स्वानंद महिला संस्था, चिंचवड, पुणे तर्फे भारतीय जनता पक्षाच्या चिंचवड मतदारसंघातील विधानपरिषदेच्या लोकप्रिय आमदार मा. उमा खापरे यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी मा. मंजू मंगल प्रभात लोढा (लेखिका ,केंद्रिय मंत्री मंगल प्रसादलोढा यांच्या पत्नी),मा. उल्हास दादा पवार (माजी अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र विकास मंडळ), पारस जी मोदी (राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली),
ललित जी कटारिया (संघवी राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया कटारिया फाऊंडेशन), प्रा. रुचिरा जी सुराणा (राष्ट्रीय महिला अध्यक्ष ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स), अभय छाजेड (सचिव, महाराष्ट्र काँग्रेस), मा. मनोहर लाल जी लोढा(अध्यक्ष पावनधाम, फतहनगर, राजस्थान), तसेच प्रा. सुरेखा कटारिया (राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष, स्वानंद संस्था), सुनीता बोरा, कल्पना कर्नावट, मंचावर उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा