*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री डॉ.मृदुला कुलकर्णी -खैरनार लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*
*पहाट*
तारकाही जाती घरा
दंगा त्यांचाही संपला
सोन चाहूल लागता
रंग प्राचीचा खुलला
दूरवरी क्षितिजाशी
ज्योत एक उजळते
छेद घेउनी तमाचा
रेष प्रकाशाची येते
हालचाल उदयाची
खग टिपती नजरे
किलबिल कानी येते
जणू आनंदाचे झरे
हलकाच शिडकावा
शोभतसे दहीवर
इवलाली फुले किती
उमलली वाटेवर
रोजचेच चक्र फिरे
देते संदेश मोलाचा
विसरुया गत क्षण
हात धरू पहाटेचा !
डॉ मृदुला कुलकर्णी
21/12/22