You are currently viewing सत्तेत येऊन वर्ष उलटले..

सत्तेत येऊन वर्ष उलटले..

…तरी पाणी प्रश्नाबरोबरच सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, दिवाबत्ती प्रश्न अद्यापही अधांतरीच – शरद ठुकरुल

 

देवगड :

सत्तेत येऊन एक वर्ष उलटले तरी पाणी प्रश्नाबरोबरच सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन तसेच दिवाबत्ती प्रश्न तसेच प्रलंबित आहेत, असा आरोप भाजपा नगरसेवक शरद ठुकरुल यांनी केला आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायतीच परिसरातील सर्व प्रश्न अद्याप अधांतरीच आहे. त्यासाठी सत्ताधारी अपयशी ठरले, अशीही टीका त्यांनी यावेळी केली.

भाजपच्या संपर्क कार्यालयामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी शरद ठुकरुल बोलत होते. सभेच्या वेळी नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, आद्या गुमास्ते, ऋचाली पाटकर आधी उपस्थित होते.

नगरपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर नवे कारभारी येऊन वर्ष झाले तरी देखील वर्षभरात शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सांडपाण्याचा प्रश्न तसेच घनकचरा व्यवस्थापन आदी प्रश्न सुटले नाहीत. शिवाय मोकाट गुरांची समस्या, भटकी कुत्री यांचाही त्रास कमी झालेला दिसत नाही. आठवडी बाजाराचा प्रश्नही सुटला नाही. उलट नगरपंचायत प्रशासन कामाची उरक करण्यात कमी पडत असल्याची सत्ताधाऱ्यांची वारंवार तक्रार होत आहे. या विरोधात उपोषण देखील करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. मात्र सत्ताधारी आपल्या अपयशाची खापर प्रशासनावर फोडू पाहत आहे, अशी टीका देखील श्री. ठुकरुल यांनी यावेळी केली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा