*वक्रतुंड साहित्य समूहाचे संस्थापक अध्यक्ष लेखक कवी श्री जगन्नाथ खराटे लिखित अप्रतिम लेख*
*अध्यात्माच्या प्रांगणात..*
उन्हाळ्याची सुट्टी पडली होती.अन, म्हणून अगदी वेळ काढून बर्याच दिवसांनी माझ्या मित्राच्या गावी गेलो,खरं तर तो नेहमीच मला गावी येण्याचा आग्रह करीत होता. “शहरातील दगदगीच्या जीवनातुन, खेडेगावातल्या निसर्गाच्या सान्निध्यात मोकळा श्वास घेण्यासाठी कधीतरी येत जा”,असं तो मला नेहमी सांगत असे.. पन् वेळेअभावी ते शक्य नव्हतं..अन् हृया वेळी मात्रं अगदी वेळ काढून आठ दिवसांसाठी गावी गेलो होतो..
खरंच, गांव असावं तर कोकणातलं, निसर्गानं अगदी भरभरून दिलं कोकणाला.. कोकणातील खेडेगावाचं ते वातावरण,निसर्गरम्य परिसर,अन् थंडगार शुध्द हवा.. हवेच्या त्या झुळकीनं मन अगदी प्रफुल्लित झालं होतं.डोंगर, दरया,अन् झुळूझुळु वाहणारे नद्या,ओहळ,….हिरव्या गर्द झाडांवरच्या पाखरांची ती मंजुळवानी गोड किलबिल,अन् नागमोड्या वाटा, वळणं घेणारी पायवाट हे सर्व मनाला स्वर्गीय सुख देत होतं..जणु स्वप्नातील सुंदर जगात आलोय,असा भास झाला होता. ते सारं लोभसवानं निसर्ग सौंदर्य निरखत,समाधानी मनाने मित्रांच्या घरी कधी पोचलो ते कळलंच नाही…
परसांत शिरतांच, समोरचं ते ऐसपैस असं प्रांगण किंबहुना अंगण…. ते पाहुन मन हरखून गेलं.अंगणात मधोमध उंच चबुतरा अन् त्यावर हिरवीगार असं तुळशी वृंदावन, वृंदावनात शंकराची पिंडी,अन्. पिंडीवर बेलफुलांची पखरन, बाजुला एक तेवत असलेला दिवा, प्रांगणात चारही बाजूंनी भलीमोठी मातीची भिंत. सभोवताली नारळ, केळी, चिकु, फनसांची लदबदलेली झाडे,हे सारं चित्रं पाहुनंच अगदी भान हरपून गेलो. वृंदावन समोरंच असलेल्या भव्यदिव्य अशा,मातिच्या जुनाट कोलारु घराकडे लक्ष गेलं..अन् हे सारं पाहूनंच घरातील मानसं कशी असतील हे कळुन चुकलं…
खरंतर घरासमोरील ते प्रांगणंच सारं काही सांगत होतं. घरात राहणाऱी मानसं कशी असतील ह्याचा आरसांच जणु…प्रांगण किंबहुना ते अंगण,.. हेंच ,सर्वांना सामावून घेणारं अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे असं मला वाटतं…..
तसं बघायला गेलं तर हे जग म्हणजे भलं मोठं प्रांगणंच आहे. ह्या जगातील भल्या मोठ्या प्रांगणात विविध जाती, धर्माची,विविध स्वभावाची, विविध आचारविचारांची,विविध सद्गुणांची दुर्गुणांची मानसं राहतात,, अन् म्हणून जगाचं प्रांगण हे वैविध्याने नटलेलं आहे असं म्हणता येईल….
जगाच्या ह्या अवाढव्य प्रांगणात
चराचर सृष्टीतल्या अनेक जीवासजि्वां स़ोबत, मनुष्य प्राणी राहतो.अशी अनेक प्रकारची मानसं राहत असली तरी ह्याच प्रांगणातील,अनंतविध प्रकारच्या देहांत, किंवा शरिररुपी घरांत अविनाशी असा जिव राहतो. पन् तो मात्रं सर्वाहुन अगदी निराळा आहे……
खरंतर , धरतीवरचं, जगाचं हे छोटसं प्रांगण, महाकाय ब्रम्हांडात असणार्या अनादी,अनंत प्रांगणांपैकी एक आहे. अशाप्रकारे अनेक लहान मोठ्या ब्रम्हांडातल्या ८४लक्ष जीवयोनी समुहांच्या सृष्टीचं संचलनाचं कार्य. सर्वशक्तिमान असा परमेश्वर करीत असतो..हे कार्य तो आपल्या दैवी शक्ती रुपातील, पंचमहाभूतांचे अधिपती असणारे देव,दानंव आणि मांनव ह्यांचामार्फत करुन घेत असतो,..,हे सारेंच जन, महाकाय ब्रम्हांडाच्या प्रांगणात अगदी अनादी अनंत काला पासून राहतं आहे..अन् म्हणूनंच ह्या महाकाय ब्रम्हांडालाच,अध्यात्माचं प्रांगण असं म्हटलं जातं…
अध्यात्म म्हणजे काय?हा एक मोठा प्रश्न आहे.. खरंतर आत्मा आणि त्यांचं घर किंबहुना देह ह्यांना समजण्यासाठीची जी कला किंबहुना विद्या आहे म्हणजे अध्यात्म असं मला वाटतं..अन् अशा सर्वांना सामावून घेणारं महाकाय ब्रम्हांडरुपी प्रांगण हे महाकाय असं सर्वसमावेशक अध्यात्माचं प्रांगण आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही….
महाकाय ब्रम्हांडातील अनादीअनंत अशा लहान लहान ब्रम्हांडांत,देव, दानव, आणि मानवासहीत,मानवेतर सृष्टी वास करते.. ….
देव म्हणजे देणारा,..खरंतर, दातृत्वाचा गुण म्हणजेंच देव,किंबहुना दातुत्वाची वृत्ती हींच देव आहे ..दानव म्हणजे ओरबाडून घेणारा.. दानव ही स्वार्थी म्हणजे असुरी वृत्ती..अन् तिलाच दानव म्हटले आहे.. जेव्हा देव आणि दानव ह्यांचे समसमान गुणधर्म एकत्रित येत असतात त्याला मानव म्हटले जाते…
स्वार्थ आणि दातृत्व ह्या दोन्हीं मिळुन तयार झालेली वृत्ती म्हणजेंच मानववृत्ती.. खरंतर ह्या तिन्ही वृत्ती, अध्यात्माचे अविभाज्य अंग आहे..अन् ह्या काही वृत्ती महाकाय ब्रम्हांडरुपी प्रांगणात, सामावलेल्या आहेत….
अध्यात्माच्या प्रांगणात वावरताना, सत्कर्म करुन,मानवीजीव हा देव बनु शकतो..अन् तोच मानवी जीव हा दुराचारी कर्म करुन दानवही बनुन शकतो..अन् हे फक्त मानवी देहातुनंच शक्य आहे .. इतर देहातुन ते शक्य नाही.. ईतर जीवयोनी किंवा जीवदेह हे पराधीन आहे..त्यांच्या जवळ कर्म स्वातंत्रय नाही.. ते बरवाईट कर्म करु शकत नाही..फक्त मानवेतर देह हे फक्त भोगप्रधान देह आहे.. पन् मानवदेह हा सर्वाहुन वेगळा आहे. मानव देह हा कर्मप्रधान देह असल्याने तो चांगलं कर्म करुन मोक्ष(देवलोक) मिळवु करु शकतो तसंच वाईट कर्म करुन अधःपतित (दानव)होवू शकतो..
.
अध्यात्माच्या प्रांगणात, मानवाला मिळालेला नरदेह हे एक वरदान आहे. परमेश्वराचा अत्यंत लाडका पुत्र असणारृया मानवास, परमेश्वराने दिलेल्या कर्मस्वातंत्र्याच्या बळावर आपलं भावी जिवन आनंदी (स्वर्गिय) अथवा दुःखी (नरकप्राय)बनवु शकतो.. हे सारं मानवाच्या हातात आहे असं मला वाटतं…
अध्यात्म हे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास,मानवदेह धारण केलेल्या जीवाने, भगवतगितेत सांगीतल्याप्रमाणे म्हणजेंच, फळाची आशा न करता, किंबहुना हे सारं काही कर्म आपन स्वतःसाठी न करता ईश्वराच्या प्रसन्नतेसाठींच करतो असे समजून कर्म करायला हवे.अन हेंच अध्यात्म आहे अशा प्रकारे कर्म करुन,आपण अध्यात्माच्या प्रांगणातुन बाहेर पडुन,अनादी अनंत अशा आपल्या परमपिता परमेश्वराच्या राज्यात जायला हवं.जे स्वयंभु आहे स्वयंप्रकाशी आहे, अन् अनादी अनंत असुन मानवी जिवनाचं अंतिम ध्यैय आहे किंबहुना मोक्ष आहे …
©️जगन्नाथ खराटे.
.