You are currently viewing आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत नियमित ताप रुग्ण सर्वेक्षण – जिल्हा हिवताप अधिकारी

आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत नियमित ताप रुग्ण सर्वेक्षण – जिल्हा हिवताप अधिकारी

आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत नियमित ताप रुग्ण सर्वेक्षण – जिल्हा हिवताप अधिकारी

बाधित भागात प्रतिबंधात्मक कार्यवाही

सिंधुदुर्गनगरी

प्राथमिक आरोग्य केंद्र कसाल मधील उपकेंद्र कसाल मधील बझरेवाडी येथे दि. ६ जानेवारी पासून किरकोळ तापाचे रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. सदर भागात ८ जानेवारी पासून आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत नियमित ताप रुग्ण सर्वेक्षण व डास अळी घनता कमी करणे करीता कंटेनर सर्वेक्षण वैद्यकीय  अधिकारी प्रा.आ.केंद्र कसाल यांचे मार्फत सुरु करण्यात आले. सदर बाधित भागात सर्व्हेक्षण करून आढळलेल्या ताप रुग्णाच्या रक्त नमुन्याची संशयित हिवताप रुग्ण म्हणुन तपासणी करणेत आलेली आहे. त्यामध्ये एकही रुग्ण हिवताप दुषित आढळलेला नाही. सदर वाडीतील दिनांक ९ जानेवारी पासून एकूण ११ तापरुणांचे डेंग्यु चिकुनगुनिया या आजार निदानासाठी रक्तजल नमुने एनआयव्ही पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविणेत आले. त्यापैकी एकूण १० रुग्ण डेंग्यु बाधित आढळुन आले आहेत. बाधित रुग्णांना आवश्यक तो औषधौपचारअंती सर्व रुग्ण बरे झालेले आहेत. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी यांनी दिली.

  बाधित भागात केलेली प्रतिबंधात्मक कार्यवाही – अ) सपुर्ण वाडीतील एकुण ४४ परामधुन धुर फवारणी करणेत आलेली आहे. ब) वाडीतील डासोत्पत्ती स्थानांत गप्पी मासे सोडणेत आलेले आहेत. क) बाधित भागासोबतच संपूर्ण गावात ताप रुग्ण सर्वेक्षण व आरोग्य शिक्षण देणेत आलेले आहे. ड) आढळलेल्या ताप रुग्णांना शासकीय दवाखान्यात त्वरीत जाणेचा सल्ला देणेत येत आहे. इ) डास अळी घनता कमी करणेकरीता आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कटेंनर सर्व्हेक्षण करणेत येत आहे. ई) अतिदक्षता म्हणून त्या भागात साथ उद्रेक घोषित करणेत आलेला आहे. उ) प्रतिबंधात्मक कार्यवाही साठी आवश्यक औषधसाठा व किटकनाशके उपलब्ध करून देणेत आलेला आहे. सदर भागात रुग्णांत वाढ होऊ नये या करीता आरोग्य विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही करणेत येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा