You are currently viewing बॅ नाथ पै यांच्या पुण्यतिथीचे औचित्य! जेष्ठ समाजवादी चळवळीचे कार्यकर्ते पद्मनाभ शिरसाट यांचा आमदार वैभव नाईक यांनी केला सन्मान

बॅ नाथ पै यांच्या पुण्यतिथीचे औचित्य! जेष्ठ समाजवादी चळवळीचे कार्यकर्ते पद्मनाभ शिरसाट यांचा आमदार वैभव नाईक यांनी केला सन्मान

नाथ पै पुण्य्तीथीला वयोमानानुसार जाता येत नसल्याने कुडाळ येथे घरीच फोटोला हार घालून केले अभिवादन

कुडाळ

बॅ नाथ पै,प्रा मधु दंडवते, माजी आमदार बाली किनळेकर,मा आमदार पुष्पसेन साव़त,यांचे सहकारी म्हणून काम केलेले कुडाळ मधील जेष्ठ समाजवादी चळवळीचे कार्यकर्ते पद्मनाभ शिरसाट यांना वयोमानानुसार या वर्षी नाथ पै पुण्यतिथीला जाता आलें नसल्याने आमदार वैभव नाईक यांनी थेट त्यांच्या कुडाळ आंबेडकर पुतळ्यासमोर निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला,या अचानक झालेल्या सन्मानाने श्री शिरसाट भाऊक होऊन आम नाईक याना आशिर्वाद दीले
कुडाळ मधिल जुन्या काळातील जेष्ठ समाजवादी चळवळीचे कार्यकर्ते पद्मनाभ शिरसाट हे दरवर्षी नाथ पै पुण्यतिथी जिल्ह्यात कुठेही असली तरी जेष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर यांच्या एका फोन वर पोचतात परंतु यावर्षी वयोमानानुसार त्यांना जाणे शक्य झाले नाही ही बाब अतुल बंगे, संतोष अडुरकर, भाऊसाहेब पाटणकर यांच्या लक्षात आल्यावर श्री शिरसाट यांचा सन्मान केलाच पाहिजे या हेतूने आम नाईक मालवण तालुक्यातील दौऱ्यात असताना या कार्यक्रमाला येण्याची विनंती केल्यावर आम नाईक यांनी श्री शिरसाट यांच्या घरी थेट जाऊन पहीले आशिर्वाद घेतले आणि शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला या सन्मानाने अगदी भारावून जात आमदार वैभव नाईक पुन्हा हॅट्रीक साधुन कुडाळ मालवण मतदार संघातील समाजवादी लोकांचा वारसा पुढे चालवतील असा आशिर्वाद दीला,या झालेल्या कार्यक्रम पाहुन श्री शिरसाट यांच्या कुटुंबाने आमदार वैभव नाईक यांचें आभार मानले यावेळी अतुल बंगे, भाऊ पाटणकर, संतोष अडुरकर, माजी नगरसेवक जिवन बांदेकर, पावशीमश माजी उपसरपंच दीपक आंगणे,साळगाव शिवसेना विभागाचे संदीप कोरगावकर, श्री पावसकर उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा