*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*
*म्हातारी आई.*
(वृद्धाश्रमातील म्हातारी आईची व्यथा)
एकदा मी गेले होते
एका वृद्धाश्रमात,
सारी वृद्ध मंडळी
दिसत होती कामात..।
एकिकडे एक म्हातारी
बसली होती कुढत,
काय झालं विचारताच
बोलू लागली रडत..।
खात्या पित्या घरची
मी श्रीमंत होते साऱ्यांत,
हे गेले अन् सापडली
मी दुर्दैवाच्या फेऱ्यात..।
पोरं पोरी सून जावई
हिडीस फिडीस करे,
सगळे करता माझा राग
म्हणता त्यांचेच खरे..।
ताई मी स्वतःच या
वृद्धाश्रमात आले,
अन् बघता बघता
इथली सदस्य झाले..।
मला कुणी इथे
येऊन पाहत नाही,
माझा जीव त्यांच्या
विना राहत नाही..।
असे कसे माझे दैव
लिहिले ईश्वराने,
जो तो मला बघतो
केवळ तिरस्काराने..।
या वृद्धाश्रमातच
प्राण माझा जावो,
कुणी माझ्या रक्ताचा
अंतिम यात्रेत न येवो..।
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*