*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरुण वि. देशपांडे यांनी आपले समूह सदस्य, कवी-मित्र- श्री.विजय जोशी (विजो) यांच्या “वृत्तबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र) यांच्या पुस्तकाचा -परिचय लेख*
——————————-
प्रसिध्द कवी-गझलकार आणि माझे मित्र – श्री.विजय जोशी (विजो) हे डोंबिवली निवासी आहेत.
कविमनाच्या या व्यक्तीने त्यांच्या साहित्य-विषयक उपक्रमांमुळे अवघ्या मराठी साहित्य-विश्वात
स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे . माझ्यासारख्या त्यांच्या असंख्य चाहते -मित्रांसाठी ही मोठ्या आनंदाची – कौतुकाची गोष्ट आहे.
कारण ही ओळख “स्व-केंद्रित कवीची नाहीये “तर , काव्य आणि गझल लेखनात धडपड करणार्या कवींना
सतत मार्गदर्शन करणार्या कवी-मित्राची आहे.”
विजो यांचा २०२२ चा कविता संग्रह “अंत:स्थ” वाचतांना मला जाणवले होते ..हा कवी ..आपल्या सोबतच्या लेखन -सोबत्यांना खूप काही देऊ शकणारा आहे म्हणूनच कवी रसिकांनी विजय जोशी ( विजो )”यांना “काव्यगुरु ” ही उपाधी प्रेमपूर्वक बहाल केली आहे.
विजय जोशी यांच्या साहित्यिक कार्याची , आणि काव्य -गझल -लेखन कार्यशाळा “या उपक्रमांची घेतलेली ही दखल आहे..
एक-दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वतहा पुढाकार घेत – इंटरनेटवर ..वृतबद्ध कविता , गझल लेखनाची ऑनलाईन
कार्यशाळा घेतली..कवी-गझालकारांचा मोठाच गोतावळा जमवला , या कार्यशाळेत काही दिवस मी पण हजेरी
लावली होती . या उपक्रमाला अफाट प्रतिसाद मिळाला , याचे एक कारण आहे -माझ्या मते –
कवी – विजय जोशी – विजो ” यांनी ” सुचना वगेरे करण्याच्या फंदात न पडता ,किंवा “मी स्वतहा यंव आहे -त्यंव आहे “असा अविर्भाव न आणता , नवीन -जुन्या अशा सर्वच कवींच्या मनातील “गझल आणि वृतबद्ध कविता लेखन “याबद्दलचा भयगंड दूर करण्याचा जो प्रयत्न केलाय “त्याला तोड नाही.
आता त्यांच्या याच कार्याला “जोड “मिळाली आहे ती .. नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ” वृतबद्ध कविता ते गझल ” या पुस्तकाची .
१८ डिसेंबर -२०२२ रोजी या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.
आपण असे ही म्हणू या की – कवी -विजो यांनी
२०२२ या वर्षा अखेरीस ..नव -वर्ष -२०२३ साठी एक मोलाची अक्षर -भेट ” लिहिणाऱ्यांना दिली आहे .
१०४ पानांच्या या छोट्याश्या पुस्तकातील मजकूर मात्र शब्दश: लाखमोलाचा आहे “,
एकूण ३१ छोट्या छोट्या प्रकरणातून कवी-विजय जोशी .यांनी . ” कविता आणि गझल-लेखनाबद्दल अगदी साध्या -सोप्या भाषेतले
शब्दातले विवेचन ” ..अजिबात क्लिष्ट नाही , बोजड तर बिलकुल नाही “.
हे लेखन वाचून ” .अनेक कवी ..गझलकार होण्याची मानसिक तयारी करू लागतील , तर कैक कवींना
हे पुस्तक “वृतबद्ध कविता लिहिण्यासाठी मदत करेल
कविवर्य -अशोक बागवे सर म्हणतात –
” नेटका व नीटस आढावा , आत्मीय शिकवण , वृत बद्धतेची किमया , गझलेचे रमल ,
आशयाला धक्का न लागता सहज होणारी मात्रांची दिंडी यांचा चिन्मयी परिपाठ या ग्रंथात अंत:स्थ जाणवला आहे “.
मला वाटते ..यात अधिक भर घालून काही सांगण्याची गरजच नाही.
वृत्बध्द कविता आणि गझल – लेखन संदर्भात ..मनातल्या शंकेचे निराकरण करणारे कवी-विजय जोशी लिखित हे पुस्तक उचित मार्गदर्शन करणारे आहे “. या पुस्तकाच्या सातशे (७०० ) प्रती लिहित्या हातांनी घेतल्या सुद्धा आहेत “, प्रचीती येण्यास हे प्रतिसाद उदाहरण पुरेसे बोलके आहे.
वृतबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र ” ) आपल्या संग्रही असले पाहिजे ” असा आग्रह एक वाचक म्हणून मी करतोय त्याचे कारण स्वतः कवी विजो” हे वृतबद्ध कविता , लयीत कविता , तंत्र आणि मंत्र सांभाळणारी गझल ” अशा लेखनाचे आग्रही -पुरस्कर्ते आहेत ” तेव्हा त्याच्या आग्रहाचा मान आपल्याला राखावाचलागेल.
या पुस्तकाचे मुखपृष्ठ करणारे कलावंत – संदेश सावंत यांचा उल्लेख जरूर करतो.
प्रकाशक -अथर्व प्रकाशन -डोंबिवली यांचे या पुस्तकासाठी आभार.
कवी-मित्र -विजय जोशी -यापुढे ही तुमच्या हातून अशीच साहित्य -सेवा ,अविरत घडो, या शुभेच्छा देतो.
———————————————————————————————————————————————————-
पुस्तक -परिचय लेख-
अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क – 9850177342
——————————————————–
विजय जोशी (विजो)
डोंबिवली
संपर्क -9892752242
पुस्तक –
वृत्त बद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र ),
पृष्ठ – १०४ , मुल्य- रु. २०० /-
——————————————————————
प्रकाशक –
अथर्व प्रकाशन , डोंबिवली .
संपर्क – 9892752242