गंगामाईच्या पूर्वा शेवाळेचे जल्लोषी स्वागत
इचलकरंजी : प्रतिनिधी
येथील गंगामाई गर्ल्स स्कूल व ज्युनिअर कॉलेजची धावपटू पूर्वा शेवाळे हिने पुणे बालेवाडी येथे झालेल्या मिनी ऑलिंपिक स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून मिळवून ब्रांझ पदक मिळवले. त्याबद्दल तिचे प्रशालेमध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले. यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेत सुद्धा तिने महाराष्ट्राकडून प्रतिनिधित्व केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
पुण्याहून कॉलेजमध्ये येतात विद्यार्थिनींनी तिचे कॉलेजमध्ये जोरदार स्वागत केले. तिला उचलून विद्यार्थिनींनी एकच जल्लोष केला. त्यानंतर प्रशालेमध्ये तिचा मुख्याध्यापिका एस. एस. गोंदकर, उपमुख्याध्यापिका सौ. एस. एस.भस्मे उपप्राचार्य आर. एस. पाटील ,पर्यवेक्षक वी. एन. कांबळे व व्ही. एस.पाटील व प्रशिक्षक शेखर शहा, अजय पवार या सर्वांच्या उपस्थितीत तिचा सत्कार करण्यात आला व पुढील क्रीडा कारकीर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रशालेतील विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मिनी ऑलिंपिक स्पर्धेत ब्रांझ पदक मिळवणारी कॉलेजची पहिली विद्यार्थिनी ठरली.
या यशाबद्दल संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा चेअरमन कृष्णा बोहरा व्हाईस चेअरमन उदय लोखंडे ट्रेझरर राजगोपाल जाळ्या सेक्रेटरी बाबासाहेब वडिंगे स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमकर,महेश बांदोडकर,अहमद मुजावर तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त व सन्माननीय पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.