You are currently viewing याद

याद

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ कवी लेखक सुभाष उमरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*याद*

तुझ्या आठवणीत जगण्याचा
माझा छंद झाला
जळतो किती रोज दिवा
तरी प्रकाश मंद झाला …

रोज छळतो वारा
गुणधर्म त्याचे तो जपतो
वाट पाहण्यात दंग मी
केवळ तुझ्यासाठी झुरतो …..

हवा हवासा तो गारवा
जरी गोठली स्वप्न माझी
हवीच सोबत कायमची
आहे उबदार सोबत तुझी ….

मृगजळामागे धावतो मी
टेकलेल्या क्षितीजा पर्यंत
भास की सत्य न कळले
प्रेम तुझे आज पर्यंत ……

माती अन् स्मृती शी
नाळ माझी जुळली आहे
साठवलेल्या क्षणाची याद
फक्त तुझ्याशी जुळली आहे …..

ऋतुचक्र हे काळाचे
नित्यक्रम हा निसर्गाचा
नाही थांबले आयुष्य
ध्यास प्रत्येकाचा जगण्याचा…..

*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*

प्रतिक्रिया व्यक्त करा