नवी दिल्ली संघटनेच्या इंडियन अचिव्हर ‘फोरम’ यांच्यातर्फे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल शाळेचे संस्थापक ॲड. रुजुल पाटणकर यांना शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी भारतीय यशवंत-२०२२ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याबाबतीत शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर सर यांनी आपले मत मांडताना असे म्हटले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता सदैव आपली शाळा, संस्था कटीबद्ध असेल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्यामधील इतरही कलांना वाव देण्यासाठी नेहमी संस्था तत्पर असेल. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी त्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण प्राप्त व्हावे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नेहमीच आपली संस्था कार्यरत राहणार व भावी पिढी घडवण्याचा प्रयत्न करणार. असा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. त्याचप्रमाणे या सर्वासाठी माझे कुटुंबीय समान संस्थेत कार्यरत असणारे सर्व कर्मचारी सदस्य, शिक्षक व पालक वर्ग यांचा पाठिंबा असल्यामुळेच आज हा शैक्षणिक प्रगतीचा, संस्थेचा विकास होत आहे. असे म्हणून स्टेपिंग स्टोन शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर सर यांनी सर्व शिक्षकांचे व पालकांचे आभार मानले.