You are currently viewing वेताळ प्रतिष्ठान म्हणजे सिंधुदुर्गाचे भूषण ; जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी

वेताळ प्रतिष्ठान म्हणजे सिंधुदुर्गाचे भूषण ; जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी

दशावतार नाट्य महोत्सव सोबत शालेय ,सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धाना उस्फुर्त प्रतिसाद

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कला क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि गेल्या काही वर्षांमध्ये कोकणची लोकपरंपरा असणाऱ्या दशावतार या सर्वांना व्यासपीठ देण्याचे काम वेताळ प्रतिष्ठान सलग नऊ वर्ष करत आहे,अबाल वृद्धांना सामावून घेताना प्रतिष्ठानने सामाजिक भान जपलेले आहे.स्वच्छता, रक्तदान, शालेय उपक्रम, गडकिल्ल्यांचे संवर्धन, रुग्णांना मोफत रूग्णपयोगी साहित्य सेवा प्रदान करणे, युवकांना प्रशिक्षण वर्ग, क्रीडा स्पर्धा अशा अनेक क्षेत्रात काम करणारे वेताळ प्रतिष्ठान हे सिंधुदुर्गासाठी खऱ्या अर्थाने भूषण आहे असे गौवोद्गार अश्वमेध महोत्सव अंतर्गत स्पर्धात्मक उपक्रमांच्या बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले.

सलग पंधरा दिवस चाललेल्या या अश्वमेध महोत्सवाअंतर्गत अनेक स्पर्धा घेण्यात आल्या, तुळस महोत्सव अंतर्गत दशावतांर नाट्यमहोत्सवाला रसिक प्रेक्षकांची तोबा गर्दी होती, नाट्य महोत्सवाची सुरुवात दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदूर्ग यांनी ‘शेषाद्मज गणेश’ ,तर आजगावकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘त्रिवेणी संगम’ आणि देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘गौरी स्वयंवर’ या नाटकांनी दशावतार नाट्य महोत्सवाची उंची वाढवण्याचे काम केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय मुलांना व्यासपीठ देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या, त्या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि गणेश पूजन करुन करण्यात आले. यावेळी व्यापीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक दादासाहेब परुळकर, प्रमुख अतिथी जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, उद्योजक सुधीर झांटये, ग्रामपंचायत सदस्य जयंत तुळसकर, निलेश नागवेकर, उपसरपंच सचिन नाईक, ज्येष्ठ दशावतार श्रीधर मुळीक, प्रगतशील शेतकरी शरद धुरी,आदर्श शिक्षक झिलू घाडी व शिक्षिका लीना नाईक, सिंधु रक्तमित्र चे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, साहस प्रतिष्ठान च्या रुपाली पाटील, प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर, निवेदक काका सावंत, बी. टी. खडपकर, मंदार तुळसकर, प्रकाश परब, कृष्णा तावडे, सुजाता पडवळ आदी मान्यवर उस्थितीत होते.

यावेळी शालेय मुलांना व्यासपीठ देण्याच्या अनुषंगाने सांस्कृतिक महोत्सवामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, यामध्ये जिल्ह्यातील २५ हून अधिक शाळांनी सहभाग घेतला. हायस्कूल साठी आयोजित विवध स्पर्धा मधून सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्याला ‘न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल उभादांडा’ ला मानाचा ‘श्री वेताळ करंडक’ मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

विविध स्पर्धा निकाल पुढीप्रमाणे:

*प्राथमिक शाळा समूहनृत्य स्पर्धा*

प्रथम क्रमांक :एम. एम.परुळेकर शाळा, मालवण

व्दितीय क्रमांक: श्री जैतीर विद्यालय तुळस

तृतीय क्रमाक: श्री वेताळ विद्यामंदिर, तुळस

उत्तेजनार्थ: प्रि. एम.आर.देसाई इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला

*प्रशालांसाठी लावणी नृत्य स्पर्धा*

प्रथम क्रमांक: मिलाग्रिस हायस्कूल, सावंतवाडी

द्वितीय क्रमांक:जि.प.शाळा वेंगुर्ला नं.१

तृतीय क्रमांक: श्री जनता विदयालय तळवडे

*प्रशालांसाठी दशावतार एकपात्री साभिनय स्पर्धा*

प्रथम: वीर गावडे (न्यू इंग्लिश स्कूल,उभादांडा)

द्वितीय: जयेश सोनुर्लेकर (वेंगुर्ला हाय.वेंगुर्ला)

तृतीय: कश्मिरा मांजरेकर (मदर तेरेसा इंग्लिश मिडीयम स्कूल वेंगुर्ला)

*प्रशालासाठी समूहनृत्य स्पर्धा*

प्रथम क्रमांक: न्यू इंग्लिश स्कूल,उभादांडा

द्वितीय क्रमांक: प्रि.एम.आर देसाई स्कुल, वेंगुर्ला

तृतीय क्रमाक: मळेवाड हायस्कूल मळेवाड

*प्रशालासाठी जोडी नृत्य स्पर्धा*

प्रथम क्रमांक: न्यु इंग्लीश स्कुल, उभादांडा

व्दितीय क्रमांक: नेमळे हाय. नेमळे

तृतीय क्रमाक: प्रि.एम. आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कूल वेंगुर्ला

*प्रशालासाठी समूहगीत गायन स्पर्धा*

प्रथम: जि.प. शाळा तेंडोली नं. १

व्दितीय क्रमांक: न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा, वेंगुर्ला

तृतीय क्रमाक : श्री वेताळ विद्यामंदिर, तुळस

*प्रशालासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा*

प्रथम क्र :न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा

द्वितीय क्र: प्रिं.एम आर देसाई इंग्लिश मिडीयम स्कूल वेंगुर्ला

तृतीय क्र: श्री जनता विद्यालय तळवडे

शालेय समूहगीत गायन स्पर्धेचे परीक्षण वीणा दळवी आणि रुपेंद्र परब यांनी केले तर तर शालेय स्पर्धांचे परीक्षण रवी कुडाळकर, तुळशीदास आर्लेकर, ओंकार परब यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी तर आभार गुरुदास तिरोडकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा