You are currently viewing सिंधुदुर्ग साईकृपा अपंग संस्थेच्या वतीने शालेय मुलांचा बक्षिस वितरण कार्यक्रम ऊत्साहात…

सिंधुदुर्ग साईकृपा अपंग संस्थेच्या वतीने शालेय मुलांचा बक्षिस वितरण कार्यक्रम ऊत्साहात…

कुडाळ

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल यांच्या वतीने लुई ब्रेन दिन व नुतन वर्षाचे औचित्त साधून दिव्यांग बांधवांसाठी विविध कार्यक्रम व शालेय मुलांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तरी या स्पर्धांनमधे कसाल बालमवाडी शाळा व कसाल १ नंबर शाळेतील मुलांनी सहभाग घेतला होता. दरम्यान स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
दोन्ही शाळेतील मुलांनी सुंदर प्रकारे चित्रकला व निबंधलेखन केले. कसाल गावचे सरपंच राजन परब व साईकृपा अपंग संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांच्या हस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी श्री. परब यांचे संस्थेच्या वतिने अभिनंद व शुभेच्छा देण्यात आले. तसेच बालमवाडी शाळाचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच कसाल शाळा नंबर १ मधील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे सहकार्य लाभले. त्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतिने निलम राणे यांनी आभार मानले. तसेच अपंगपुनर्वसन ओरोसचे प्रितम मठकर या कार्यक्रमास उपस्थित होते.
कसाल शाळा नं १ मधील विद्यार्थी निबंध लेखन स्पर्धेत दुर्वा येंडे (प्रथम क्रमांक), सुष्टी सावंत (द्वितीय क्रमांक), दिव्या आंगणे (तृतीय क्रमांक) तसेच चित्रकला स्पर्धा स्वयंम बांदेकर (प्रथम क्रमांक), ओम दिवटे (द्वितीय क्रमांक), सुमन शिरवनकर (तृतीय क्रमांक)

बालमवाडी शाळेतील विद्यार्थी निबंधलेखन स्पर्धेत सोनम प्रजापती (प्रथम क्रमांक), केतकी राणे (द्वितीय क्रमांक), किमया राणे (तृतीय क्रमांक) तसेच चित्रकला स्पर्धेत सिध्दार्थ हंचिमणी (प्रथम क्रमांक), पवन प्रजापती (द्वितीय क्रमांक), आयुष गावडे व पार्थ बालम (तृतीय क्रमांक).

प्रतिक्रिया व्यक्त करा