*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*
*महागाई.*
रडारड सुरू झाली
अशी वाढे महागाई,
कुणा आठवते बाप
कुणा आठवते आई..।१।
जीवनावश्यक वस्तू
साऱ्या जाहल्या महाग,
बघता बघता जशी
जगा लागलीसे आग..।२।
झाले कठिण इतुके
सर्व सामान्याला जीने,
हाता तोंडाची ती गाठ
पडे मोठ्या संकटाने..।३।
नाही सोसवत आता
महागाईचा हा भार,
आला ध्यानात सर्वांच्या
जीवनामधला सार..।४।
गोरगरिबाने आता
कसे जीवन कंठावे,
पोट भरासाठी काय
फक्त मातीगोटे खावे..।५।
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:-9420095259*