You are currently viewing मडुरा -सातार्डे रस्ता तातडीने दुरुस्ती करा

मडुरा -सातार्डे रस्ता तातडीने दुरुस्ती करा

सामाजिक कार्यकर्ते प्रितेश गवंडी यांची मागणी

बांदा

शेर्ले-मडुरा मार्गे सातार्डा रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना येजा करताना तारेवरची कसरत करावी लागते. अशावेळी अनेक अपघात घडले असून मोठी हानी होण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन सदर रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी, मडुरा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रितेश गवंडी यांनी केली आहे.

शेर्ले-मडुरा मार्गे सातार्डा रस्ता अनेक वर्षापासून खडीकरण व डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. सद्यस्थितीत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही. नवख्या वाहनधारकांना तर खड्ड्यांमुळे जीवघेणा मार्ग बनला आहे. यापूर्वी अनेक लहान-मोठे अपघातही झाले परंतु प्रशासनास याची जाग आली नाही. त्यामुळे भविष्यात होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने योग्य ते पाऊल उचलावे अशी मागणी प्रितेश गवंडी यांनी केली आहे.दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनामिका चव्हाण यांनी सदर मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर कार्यवाही सुरू करणार असल्याची ग्वाही दिल्याचे प्रितेश गवंडी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा