कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औषध कर्मचाऱ्यांच देवगड जामसंडे येथील श्री.मो.गोगटे मैदान,सांस्कृतिक भवन येथे नुकतंच वार्षिक स्नेहभोजन उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाच उदघाटन देवगड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते प्रविण जोग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
त्या प्रसंगी देवगड तालुक्यातील किशोर कुळकर्णी, सुनिल कुळकर्णी,योगेश बोभाटे,संदीप वारीक,सनित आचरेकर,मिलिंद मोर्ये,योगेश गुरव, श्री.रामाने,राहुल शिरसाट, बंटी पडवळ, विजय पडवळ,मंगेश घरकर,अभय कुळकर्णी हे केमिस्ट बांधव उपस्थित राहून औषध कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले.उद्घाटन प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औषध कर्मचारी हे आमचे कर्मचारी नसून ते आमच्या घरातील व्यक्ती तसेच आमचे जवळचे सहकारी आहेत,आपल्या औषध व्यवसायात कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असल्याच प्रतिपादन श्री. जोग यांनी केले.
जिल्ह्यातील बहुसंख्य औषध कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.त्या निमित्त औषध कर्मचाऱ्यांची सालाबादप्रमाणे क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती.त्या स्पर्धेत अंतिम सामन्यात कुडाळ संघावर मात करून कणकवली संघाने चौथ्यांदा विजेतेपद पटकावले.या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज कणकवली संघाचा अमित मनचेकर तसेच उत्कृष्ट गोलंदाज कुडाळ संघाचा महेंद्र परब यांना घोषित करण्यात आलं.विजेता आणि उपविजेता संघांना किशोर कुलकर्णी आणि सुनिल कुळकर्णी यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला वेंगुर्ला तालुका केमिस्ट असोसिएशनचे विवेक खानोलकर,रोहित नाईक, आशिष पाडगावकर,सचिन भानुशाली,संदीप कडव यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
तसेच या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व तालुकाध्यक्ष आणि सर्व जेष्ठ कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते.कार्यक्रम पार पाडण्यासाठी देवगड तालुका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जयराम राऊळ आणि त्यांच्या सर्वच सदस्यांनी खूप मेहनत घेतली त्यासाठी जिल्ह्याभरात त्यांचं कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष समीर ठाकुर यांनी केले तर आभार अरुण घाडी यांनी मानले.