You are currently viewing कणकवलीत दीपोत्सव स्पर्धेचा शुभारंभ  विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती…!

कणकवलीत दीपोत्सव स्पर्धेचा शुभारंभ  विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती…!

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन…!

कणकवली

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ११९ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त परमहंस भालचंद्र महाराज संस्थान व वाळकेश्वर मंगल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते १३ जानेवारी या कालावधीत दीपोत्सव स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन संचयनी बिल्डिंग येथील पारकर घरासमोर भालचंद्र महाराज संस्थांचे अध्यक्ष
सुरेश कामत यांच्या हस्ते झाले. यावेळी काशीविश्वेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अँड प्रवीण पारकर, खजिनदार दादा नार्वेकर, विश्वस्त उमेश वाळके, प्रसाद अंधारी, राजन पारकर, ज्येष्ठ नागरिक रमेश पारकर, संस्थानाचे व्यवस्थापक विजय केळुस्कर, भरत उबाळे,विजय पारकर,आबा जामसांडेकर,बाळू पारकर, श्रीरंग पारगावकर, नंदू ओटवकर, महेश आवटी, नीलेश पारकर,निधी निखार्गे,नेहा पारकर,पूजा निखार्गे, विशाखा पाटकर, निलेश निखारगे आदी उपस्थित होते. परीक्षक रविकिरण शिरवलकर, अवधूत लाड, निधी निखार्गे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत अंतर्गत मंडळ सजावट व घर सजावट स्पर्धा घेतली जाणार आहे. ही स्पर्धा भालचंद्र महाराज यांची पालखी ज्या मार्गावरून जाते त्या मार्गावरील मंडळ व घरांसाठीच असणार आहे. मंडळ सजावट स्पर्धेसाठी प्रथम – ११ हजार १११ रु.,
द्वितीय–७ हजार ७७७ रु., तृतीय ५ हजार ५५५ रु. व चषके अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. घर सजावट स्पर्धेसाठी प्रथम – ५ हजार ५५५ रु. द्वितीय – ३ हजार ३३३ रु., तृतीय २ हजार २२२ रु., दोन उत्तेजनार्थसाठी १ हजार १११ रु. अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहे. सुजान प्रेक्षकासाठी १ हजार १११ रु. बक्षीस ठेवण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा