जिल्हाध्यक्ष प्रबंधक रविकिरण जन्नू यांची भेट घेत प्रश्नांची केली सरबत्ती
सावंतवाडी
आरोस गावात मागील तीन दिवस नेटवर्क विना गावकरी त्रस्त असल्याने आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रबंधक श्री जन्नू यांना घेराव घालत वारंवार होणाऱ्या रेंजच्या समस्या विषयी चर्चा केली तर काम सुरू असल्याचे सांगत उद्यापर्यंत आरोस गावातील रेंज पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचे श्री जन्नू यांनी आश्वासन दिले तसेच तालुक्यातील इतर गावातील रेंज संदर्भातही चर्चा करण्यात आली तसेच काही दिवसांपूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या पगारासंदर्भातही धडक दिली होती त्यानंतर एका ठेकेदाराने संपूर्ण पगार कामगारांचा घातल्याची माहिती ही श्री जन्नू यांनी दिली. तसेच गावातील इंटरनेट संदर्भातही अनेक समस्या असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला तर इंटरनेट व रेंज सुरळीत ठेवा अन्यथा गावातील लोकांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला यावेळी म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर माजी संपर्क अध्यक्ष महेश परब कौस्तुभ नाईक प्रवीण गवस बाळा बहिरे मिलिंद सावंत सुनील आसवेकर आदी उपस्थित होते.