You are currently viewing कोकणातल्या शेतकऱ्यांना धीर देताहेत डॉ. निलेश राणे

कोकणातल्या शेतकऱ्यांना धीर देताहेत डॉ. निलेश राणे

खासदार विनायक राऊत करताहेत सोलापूर दौरा

रुपाली कलिंगण

अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात आहे, एकीकडे कापून ठेवलेलं पीक गेलं तर दुसरीकडे कापणीला आलेलं पीकही गेलं आहे. मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहत नाही. एवढंच काय अजून कोकणात पंचनामे झाले नाहीत, भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे स्वतः लक्ष घालून पाहणी दौरे करत आहेत, शेतकऱ्यांना धीर देत आहेत. मात्र ज्या शिवसेनेला कोकणच्या माणसांनी भरभरून दिलं त्या सत्ताधारी शिवसेनेने मात्र आज या संकटात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. तर विनायक राऊत मुख्यमंत्र्यांसोबत सोलापूर दौरा करत होते. सत्ताधारी शिवसेना तर दूरच पण ज्या मतदारसंघातुन निवडून आलेले खासदार विनायक राऊत ही रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आलेले नाहीत.

जनतेनी कोकणात सेनेच्या आमदार, खासदार, यांना निवडून देऊन चूक केली आहे. तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब सुद्धा जिल्ह्यात फिरकताना दिसत नाही. कोकणच्या नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसायला आमदार, खासदार, पालकमंत्री यांना वेळ नाही, सत्ताधारी मदत करायला तयार नाहीत. मात्र निलेश राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पाहणी करत आहे, शेतकऱ्यांना धीर देत आहे, पंचनामे करण्यासाठी प्रशासनावर लक्ष ठेऊन आहे. कोकणच्या शेतकऱ्यांनी आता शिवसेनेचा हा सत्तेचा माज कायम लक्षात ठेवावा.

कोकणातील शेतकऱ्यांकडे राज्य सरकारच दुर्लक्ष आहे आहे असे स्पष्ट चित्र पाहायला देखील मिळत आहे. जेव्हा निलेश राणे गावा-गावात जाऊन पाहणी दौरे करत असताना शेतकरी सुध्दा म्हणाले, “भातशेतीचे नुकसान होऊन कुणी सत्तेतला नेत्यांनी आम्हाला धीर द्यायला आले नाहीत. राणे साहेब तुम्हीच आलात आम्हाला धीर देऊन तात्काळ मदत केली. ह्या सरकारकडून आम्हाला मदत मिळेल अशी अपेक्षा सुद्धा नाही.” असे सांगितले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांला पुन्हा उभे करण्यासाठी तात्काळ मदतीची गरज असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना तात्काळ २५ हजाराची मदत देण्याचे सांगितले होते. ते अजूनही दिलेले नाहीत. उलट पुन्हा यावेळी परतीच्या पावसामुळे शेतकरी उध्वस्त झाला असून शेतकऱ्याला तात्काळ मदतीची मोठी गरज आहे. तरी राजकीय सरकारने कोकणातल्या शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा