You are currently viewing कणकवलीतील टिंगल कॉन्टेरो नव्या जागेच्या शोधात….

कणकवलीतील टिंगल कॉन्टेरो नव्या जागेच्या शोधात….

कॉन्टेरोला जुगार सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नल.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची धुरा नवीन अधीक्षकांच्या हातात आली. मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात अवैद्य धंद्यांना ऊत आला होता. परंतु काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या जुगाराच्या बैठकांना संवाद मीडियाने आवाज उठवल्यामुळे चाप बसला होता. मध्यंतरीच्या काळात धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीने याच जुगाऱ्यांनी रीतसर भूमिपूजन करून मोठ्या दिमाखात कासार्डे येथे रमी खेळण्यासाठी क्लब सुरू केला. या क्लबमध्ये नावसाठीच रमीचा खेळ दाखवला जातो. रीतसर परवानगी घेतलेल्या क्लबमध्ये सौदेबाजी होत नसते, परंतु या क्लबमध्ये दारातच सौदेबाजी होते आणि त्यानंतरच आत प्रवेश दिला जातो. त्यामुळे कासार्डे येथे सुरू केलेला क्लब हा नावसाठीच क्लब असून तिथे दर दिवशी साडेचार लाखांची उलाढाल होत आहे.
कासार्डे येथील क्लबचा व्यवहार सुरळीत झाल्यावर आत्मविश्वास वाढलेल्या जुगाऱ्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा जुगाराच्या बैठका बसविण्याकडे वळविला आहे. जुगाराच्या बैठकांसाठी त्यांनी संबंधित खात्याशी बोलणी केली असून, संबंधित खात्याच्या अधीक्षकांनी जिल्ह्यात जुगार सुरू करण्यासाठी हिरवा सिग्नल दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे कणकवलीतील टिंगल कॉन्टेरो जुगाराच्या तकशीम साठी नवीन जागेच्या शोधात आहे.
गुन्ह्यांवर रोख लावणाऱ्यांनीच हिरवा सिग्नल दिल्यामुळे जुगाऱ्यांचा आत्मविश्वास अधिकच दुणावला आहे, आणि त्यामुळेच ते सुरक्षित जागा शोधत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा